Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश‘मुगल-ए-आझम’ला मुस्लिमांनी विरोध केला नव्हता- आझम खान

‘मुगल-ए-आझम’ला मुस्लिमांनी विरोध केला नव्हता- आझम खान

उत्तरप्रदेश:पद्मावतीया चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात आता समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी उडी घेतली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड असणाऱ्या मुगल-ए-आझमया चित्रपटात दाखवण्यात आलेल्या गोष्टी ऐतिहासिक संदर्भाशी मिळत्याजुळत्या नव्हत्या. मात्र, मुस्लिम समाज मोठ्या मनाचा असल्यामुळे त्यांनी चित्रपटाला विरोध केला नाही, असे आझम खान यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पद्मावती हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र, करणी सेनेसारख्या संघटनांच्या विरोधामुळे सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक त्रुटींचे कारण पुढे करत निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यास भाग पाडले होते. या पार्श्वभूमीवर आझम खान यांनी मंगळवारी जाहीर कार्यक्रमात भाष्य केले. सध्या देशात एका चित्रपटाच्या कथानकावरून वाद निर्माण झाला आहे. भारतीय सिनेसृष्टीतील ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटात अनारकलीला सलीमची प्रेयसी दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही नव्हते. तरीही कोणत्याही मुस्लिमाने या गोष्टीवर आक्षेप घेतला नाही. मुस्लिम समाज मोठ्या मनाचा आहे, त्यांना ही गोष्ट माहिती आहे की, एखादा चित्रपट आपला इतिहास बिघडवू शकत नाही, असे आझम खान यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments