Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशनिर्भया : खुन्यांच्या एकत्र फाशीवर गुरुवारी फैसला

निर्भया : खुन्यांच्या एकत्र फाशीवर गुरुवारी फैसला

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार व खून खटल्यात फाशी ठोठावलेल्या चारही खून्यांना एकाच वेळी फासावर लटकविणे गरजेचे आहे का, याबाबत गुरुवारी त्याबाबत सुनावणी होणार आहे.

चारही खुन्यांना एकाच वेळी फासावर लटकविणे गरजेचे आहे का, हा मुद्दा खुला ठेवत सर्वोच्च न्यायालयाने या चौघांविरुध्द नव्याने डेथ वॉरन्ट जारी करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्यास दिल्ली प्रशासनास मुभा दिली. आरोपी विनय शर्माने राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याने त्याविरोधात अर्ज केला आहे.

चारही खून्यांना १ फेब्रुवारीरोजी फाशी दिली जाणार होती. आरोपी पवन गुप्ताने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्याचा निर्णय झाल्याखेरीज फाशी देता येणार नाही, असे म्हणून सत्र न्यायालयाने चौघांच्याही डेथ वॉरन्टला स्थगिती दिली. दिल्ली सरकारने याविरुध्द रिट याचिक उच्च न्यायालयाने ५ फेब्रुवारी रोजी फेटाळली. त्यानंतर दिल्ली सरकारने नव्या डेथ वॉरन्टसाठी सत्र न्यायालयाकडे अर्ज केला. सात दिवसांची मुदत संपली नसल्याने तो फेटाळला गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments