Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश...आता 'त्या' पोलिंग अधिकार्‍याच्या ‘गुलाबी साडी’ची चर्चा!

…आता ‘त्या’ पोलिंग अधिकार्‍याच्या ‘गुलाबी साडी’ची चर्चा!

Reena Dwivedi,pink saree, yellow saree, vote, voetrs, लखनऊ : लोकसभा निवडणुकांच्या वेळी पिवळ्या साडीने रिना द्विवेदी या पोलिंग बूथ अधिकारी चर्चेत आल्या होत्या. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले होते. त्या रिना द्विवेदी यंदाही लखनऊमध्ये पोटनिवडणुकीत ड्यूटीवर असताना त्या गुलाबी साडीतील नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहेत. याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.

रिना द्विवेदी या लखनऊच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत. त्या लखनौमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ड्युटीवर होत्या. त्यांची नियुक्ती कृष्णा नगर येथील एका कॉलेजमध्ये होती. उत्तर प्रदेशातील अकरा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.

रविवारी सकाळी जेव्हा रिना पोलिंग बूथवर ईव्हीएम किट घेण्यासाठी पोहचल्या होत्या, त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. मी सुरुवातीपासूनच लेटेस्ट फॅशन फॉलो करते, मागच्या निवडणुकीच्या वेळी माझे पिवळ्या साडीतील फोटो व्हायरल झाले आणि सगळे मला पिवळ्या साडीवाली मॅडम म्हणून ओळखू लागले, असं रिना माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments