आता ‘पॅराडाईज पेपर्स’ घोटाळा, ७१४ भारतीयांचा समावेश

- Advertisement -

नवी दिल्ली – पनामा पेपर्स प्रकरणानंतर आता ‘पॅराडाईज पेपर्स’ घोटाळा समोर आला आहे. यामध्ये जगभरातील श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे, तर ७१४ भारतीयांची नावे आहेत. जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ हे वृत्तपत्र, भारतातील ‘इंडियन एक्सप्रेस’ तसेच जगभरातील ९६ माध्यमांच्या संस्थांनी हा घोटाळा जगासमोर आणला आहे.

‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये बोगस कंपन्या स्थापन करून त्याद्वारे परदेशात पैसा जमवणाऱ्या जगभरातील श्रीमंतांचा समावेश आहे. भारतातील सिनेसृष्टीतील कलावंत, उद्योजक, नेते यांचा यात समावेश आहे. रविवारी १३.४ दशलक्ष दस्तावेजांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. पॅराडाईज पेपर्समध्ये १८० देशांचा समावेश असून भारत १९ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे यामध्ये ब्रिटनची राणी एलिझाबेथ व्दितीय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचाही समावेश आहे.

अमेरिकेतील उद्योग मंत्री विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निधी संकलन करणारे, रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पूतीन यांचा जावई, अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी विलब्मर रॉस यांचीनावेही या यादीत आहे. नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, विजय माल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी दिलनिशान संजय दत्त म्हणजेच मान्यता दत्त या भारतीयांच्या नावाचा या यादीमध्ये समावेश आहे.२०१६ मध्ये पनामा पेपर्स प्रकरण उजेडात आले होते. त्यामध्ये ५०० भारतीयांच्या नावाचा समावेश होता. आता ८ नोव्हेंबरला सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असतानाच पॅराडाईज पेपर्स प्रकरण पुढे आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -