Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश…आता गुवाहटीमध्ये धावणार ‘ओला’ची रिव्हर टॅक्सी

…आता गुवाहटीमध्ये धावणार ‘ओला’ची रिव्हर टॅक्सी

आसाम: ओला कंपनी आपल्या टॅक्सी सेवेमुळे मागच्या काही दिवसांत चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. ग्राहकांना पाहिजे त्या ठिकाणी सेवा पुरवणारी ही कंपनी आता आपली आणखी एक नवीन ओळख निर्माण करत आहे. आसाममधील गुवाहटी येथे रिव्हर टॅक्सी सर्व्हीस सुरु केली आहे. हा उपक्रम नागरिकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे याचे कारण म्हणजे ज्याठिकाणी एका व्यक्तीला प्रवास करण्यासाठी ४५ मिनीटांचा कालावधी लागतो त्याठिकाणी व्यक्ती केवळ २ ते ३ मिनीटांत पोहचू शकणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर चालणाऱ्या या प्रयोगासाठी ओलाने आसाम हे राज्य निवडले आहे. यासाठी ओलाने आसाम सरकारशी सामंजस्य करार केला असून सुरुवातीला ही सेवा गुवाहटी येथे देण्यात येणार आहे. ईशान्य भारतातील गुवाहटी हे आर्थिक व्यवहारांचे मुख्य केंद्र असल्याने ओलाने या शहराची निवड केल्याचे म्हटले आहे. या रिव्हर टॅक्सी पाण्यावर चालणाऱ्या मशीनबोट असतील. तसेच यामुळे वेळेची बचत होणार असल्याने नागरिकांसाठी ही सेवा अतिशय फायदेशीर असेल. माचकोवा येथील लचित घाटपासून उत्तर गुवाहटीपर्यंतच्या मार्गावर या रिव्हर टॅक्सी धावतील असे सांगण्यात आले आहे.

आता ओलाच्या टॅक्सीसाठी ज्याप्रमाणे अॅप्लिकेशनवरुन बुकींग करावे लागते. त्याचप्रमाणे या रिव्हर टॅक्सीसाठी बुकींग करावे लागणार आहे. वाहतूक सुविधा जास्तीत जास्त सोयीची व्हावी यादृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. गुवाहटीमध्ये २०१४ मध्ये ओलाने आपली टॅक्सी सेवा सुरु केली असून आताच्या रिव्हर टॅक्सीमुळे वाहतूक जास्त सुरळीत होण्यास मदत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments