Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशआरबीआयपेक्षा तिरूपती देवस्थानात वेगाने पैसे मोजले जातात

आरबीआयपेक्षा तिरूपती देवस्थानात वेगाने पैसे मोजले जातात

महत्वाचे….
१.राजीव गांधींमुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा
२.काँग्रेसच्या धोरणांमुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत
३. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिरूपती देवस्थानातील हुंडी कलेक्टर्सकडे जावे


नवी  दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेला जे यश मिळाले आहे त्याचे बीज १९९० मध्ये राजीव गांधी यांनीच लावले होते. त्याला डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रोत्साहन दिले. आज भाजपा किंवा एनडीए काहीही म्हणोत, पण याबाबतची आकडेवारी स्वत:च सर्व काही सांगते, असे म्हणत काँग्रेसच्या धोरणांमुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिरूपती देवस्थानातील हुंडी कलेक्टर्सकडे जावे. ते तुमच्यापेक्षा जास्त वेगाने पैसे मोजतात, असा टोलाही लगावला.

नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या किती नोटा परत आल्या याची माहिती रिझर्व्ह बँक अद्याप देऊ शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी रिझर्व्ह बँकेलाही उपहासात्मक सल्ला दिला.

 

ANI

✔@ANI

I would like to tell the RBI officials why don’t you go to Hundi collectors in Tirupati? They count money faster than you – P Chidambaram on demonetisation at #CongressPlenarySession

१२:२८ म.उ. – १८ मार्च, २०१८

काँग्रेसच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या १४ कोटी पर्यंत आणण्यात मनमोहन सिंग यांना मोठे यश आले होते. परंतु, भाजपाच्या काळात आता दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या वाढल्याचा आरोप त्यांनी केला. राजीव गांधी यांच्या धोरणामुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावाही त्यांनी केला.

✔@ANI

The current phase of economic growth started in 1990s when Rajiv Gandhi sowed seeds of liberalisation. This gained momentum under Dr Manmohan Singh. Whatever the BJP, the NDA may say, records speak for itself: P Chidambaram at #CongressPlenarySession

रम्यान, चलनातून बाद झालेल्या किती नोटा प्राप्त झाल्या आहेत, याची माहिती रिझर्व्ह बँक देऊ शकलेली नाही. हे पैसे मोजण्याचेच काम सुरू असल्याचे बँकेकडून सांगितले जाते. चिदंबरम यांनी यावरून बँकेच्या कारभारावर टीका केली. तिरूपतीतील हुंडीत जमा झालेले पैसे मोजणारे कर्मचारी अत्यंत वेगाने पैसे मोजतात. त्यांच्याकडे रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घ्यावे असा खोचक सल्ला ही दिला.

तत्पूर्वी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही मोदी सरकारवर टीका केली. नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी आपल्या प्रचारात अनेक अवाजवी आश्वासनं दिली. मोठमोठी स्वप्नं दाखवली. पण ही स्वप्नं वास्तवात कधीच पूर्ण होणारी नव्हती, अशी टीका करत देशातील युवकांसाठी दोन कोटी रोजगार निर्माण करणार असल्याचे सांगितले. पण अजून दोन लाख जणांनाही नोकरी मिळाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

✔@ANI

It’s the biggest achievement of Dr Manmohan Singh that 14 Cr people were listed out of poverty. BJP govt pushed people into poverty. Number of people below poverty line went up. It’s the greatest disservice BJP govt did to people of India: P Chidambaram at #CongressPlenarySession

P Chidambaram Criticized On Rbi Modi Government In Congress Plenary Session

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments