Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींनी ‘या’ कारणामुळे बदलली भूमिका

पंतप्रधान मोदींनी ‘या’ कारणामुळे बदलली भूमिका

citizenship amendment bill is historic says pm modi at bjp parliamentary meetingनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी सोशल मीडिया सोडू इच्छितो, अशा प्रकारचे ट्विट सोमवारी रात्री केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली होती. मात्र, आज पुन्हा मोदींनी एक ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडिया सोडण्यामागचं सत्य जाहीर केलंय. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्तानं सोशल मीडियाद्वारे एक नवीन उपक्रम जाहीर केलाय. आपल्या आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या महिलांचा गौरव यानिमित्तानं केला जाणार आहे. सोशल मीडिया सोडणार नसल्याचे स्पष्ट जाहीर केले.

पंतप्रधानांच्या ट्विटनंतर थोड्याच वेळात ‘नो सर’ ट्रेन्ड करायला लागलं. तर काहींनी खोचक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मंगळवारी सकाळीही हा टॉप ट्रेन्ड होता. हा हॅशटॅग वापरून चाहते पंतप्रधानांना सोशल मीडियातून बाहेर न पडण्याची विनंती करत आहेत. ‘अनेक त्रुटी असल्या तरी हे शक्तीशाली माध्यम आहे’ असं पंतप्रधानांचे चाहते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे सोशल मीडियावरचे अकाऊटंस बंद करण्याचा विचार करतोय, असं मोदी यांनी ट्वीट केलं आहे. लवकरच तुम्हाला यासंदर्भात कळवेन असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या या ट्वीटनंतर अनेक दिग्गजांसह सामान्य माणसांनीही यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी मोदींना सोशल मीडिया सोडू नका, अशी विनंतीही केली आहे. तर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासमवेत अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी मोदींवर टिका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मोदींच्या त्या ट्विटमुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments