Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशमहाठग नीरव मोदीविरोधात इंटरपोल नोटीस जारी

महाठग नीरव मोदीविरोधात इंटरपोल नोटीस जारी

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) महाघोटाळ्यातील आरोपी महाठग नीरव मोदीविरोधात भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून शुक्रवारी इंटरपोल डिफ्युजन नोटीस जारी करण्यात आली. नीरव मोदीसोबत त्याची पत्नी अमी मोदी, भाऊ निशाल मोदी आणि गीतांजलीचे प्रमोटर मेहुल चौकसी यांना पकडण्यासाठी इंटरपोललाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चौकसी यांच्या या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदी, पत्नी अमी मोदी, भाऊ निशाल मोदी आणि गीतांजलीचे प्रमोटर मेहुल चौकसी हे चौघेही जानेवारीच्या सुरुवातीलाच भारतातून पसार झाले होते. सध्या नीरव मोदी स्वित्झर्लंडमध्ये लपून बसल्याची चर्चा आहे. याआधी अंमलबजावणी संचलनालयाने मोदी आणि चौकसीला समन्स बजावले होते. सीबीआयनेही या दोघांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे.
तत्पूर्वी सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारपासून नीरव मोदीच्या देशभरातील मालमत्तांवर छापे टाकायला सुरूवात केली. यात ५१०० कोटी रुपयांची हिरे, ज्वेलरी, मौल्यवान खडे आणि सोन्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मोदी आणि अन्य आरोपींच्या मुंबईतील पाच संपत्ती सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय बँक खात्यातील रक्कम आणि फिक्स डिपॉझिटची ३.९ कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून ही कारवाई केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मुंबई, हैदराबाद, जयपूर, गुजरात आणि दिल्लीमध्ये किमान १७ जागांवर करण्यात आली. ईडीने ज्या जागांवर ही कारवाई केली त्यात मोदीचे मुंबई येथील कुर्ला भागातील घर, काळा घोडा भागातील ज्वेलरीचे दुकान, वांद्रा आणि लोअर परळ भागातील कंपनीची तीन ठिकाणे, गुजरातमधील सुरत येथील तीन ठिकाणे आणि दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी व चाणक्यपुरी भागातील मोदीचे शोरूम यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments