Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशप्रद्युम्न हत्याकांड : कंडक्टर ७३ दिवसांनी तरुंगातून आला बाहेर

प्रद्युम्न हत्याकांड : कंडक्टर ७३ दिवसांनी तरुंगातून आला बाहेर

गुरुग्राम (गुडगाव) – प्रद्युम्न हत्याकांड प्रकरणात मंगळवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी यादव यांनी आरोपी बस कंडक्टर अशोक कुमार ला ७३ दिवसांनंतर जामीन मंजूर केला. अशोकला सप्टेंबरला हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी कोर्टात दोन्ही बाजुंच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडले. त्यानंतर कोर्टाने निकाल राखीव ठेवला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली.

४० मिनिटे चालली सुनावणी..
– सोमवारी प्रकरणाची सुनावणी दुपारी १२ वाजता जिल्हा सत्र न्यालयात सुरू झाली. सीबीआयचे ५ अधिकारी वकीलाबरोबर वरुण ठाकूर (प्रद्युम्नचे वडील) आणि त्यांचे वडील सुशील टेकरीवाल आणि अशोक यांचे वकील मोहित वर्मा कोर्टात उपस्थित होते. कोर्टातील वाद-प्रतिवादादरम्यान सीबीआयने सरकारकडून सादर करण्यात आलेले प्रतित्रापत्र सादर केले.
– सुमारे ४० मिनिटे सुनावणी चालली. सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित डॉक्युमेंटही कोर्टात सादर केले. सीबीआयने म्हटले की, त्यांचा ज्युडिशियल एरिया पंचकुलामध्ये आहे. तर सीबीआयचे स्पेशल कोप्ट आहे, त्यामुळे सुनावणी तेथेच व्हायला हवी.

सीबीआयने केला होता जामीनाला विरोध
– कोर्टात सीबीआयच्या वकिलांनी म्हटले की, तपास अजूनही सुरू आहे. कंडक्टर अशोकला क्लीन चीट देण्यात आलेली नाही. सर्व फॅक्ट्सवर आमची नजर आहे. केसमध्ये जोपर्यंत सीबीआय चार्जशीट दाखल करत नाही, तोपर्यंत कोणालाही क्लीनचीट देता येणार नाही.
– सीबीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, सीबीआयने विद्यार्थ्याला आरोपी ठरवले असले तरी त्या मुद्द्यावर अशोकला सोडता येणार नाही.

काय आहे प्रकरण…
– गुरुग्राम (गुडगाव) रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये ८ सप्टेंबरला ७ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. टॉयलेटमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारला अटक केली होती. आरोपी अशोकने ८ महिन्यांपूर्वीच शाळेत कंडक्टरची नोकरी सुरू केली होती.
– अशोकने मीडियाला सांगितले की, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी मुलांच्या टॉयलेटमध्ये होतो आणि त्याठिकाणी वाईट कृत्य करत होता. त्याचवेळी त्याठिकाणी तो मुलगा आला. त्याने मला पाहिले. मी आधी त्याला धक्का दिला नंतर त्याला ओढले. तो ओरडायला लागला तेव्हा मी घाबरलो. त्यानंतर त्याला दोनवेळा चाकू मारला आणि त्याचा गळा कापला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments