Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशटिकेनंतर प्रज्ञा ठाकूरांना महात्मा गांधींच्या योगदानाची आठवण

टिकेनंतर प्रज्ञा ठाकूरांना महात्मा गांधींच्या योगदानाची आठवण

pragya singh thakurनवी दिल्ली : महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा देशभक्त म्हणून उल्लेख केल्या प्रकरणी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनी आज लोकसभेत माफी मागितली. राष्ट्राच्या उभारणीत महात्मा गांधीयांनी दिलेल्या योगदानाचा मी आदर करते. असं विधान केलं. दिलगिरी व्यक्त केली.

प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, लोकसभेत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. तरीही माझ्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतीलतर मी दिलगिरी व्यक्त करते,’ असं साध्वी म्हणाल्या. लोकसभेत आज पुन्हा साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. काँग्रेस साध्वी प्रज्ञा यांच्या निषेधाचा ठराव मांडण्याच्या तयारीत होती. मात्र, साध्वी यांनी आपल्या वक्तव्यावरून सपशेल माघारघेत माफी मागितली.

यावेळी प्रज्ञा यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावरहीनिशाणा साधला. ‘सभागृहाच्या एका सन्मानित सदस्यानं मला दहशतवादी म्हणून संबोधलं आहे. माझ्याविरुद्ध न्यायालयात कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही. असं असताना दहशतवादी म्हणणं हा एका महिलेचा अपमान आहे,’ असं साध्वी म्हणाल्या. त्यानंतरही काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. प्रज्ञा यांनी माफी मागितली आहे. आता या विषयावर राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments