Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशसलमानला 'ती' अभिनेत्री तुरुंगात जाऊन भेटली!

सलमानला ‘ती’ अभिनेत्री तुरुंगात जाऊन भेटली!

preetiy zinta, salman khanजोधपूर: अभिनेता सलमान खानला भेटण्यासाठी डिंपल गर्ल प्रीती झिंटा आज सकाळी सेंट्रेल जेलमध्ये पोहचली होती. सलमान हा बॉलिवडूच्या प्रत्येक कलाकाराच्या पाठिमागे नेहमीच उभा राहतो. प्रितीच्या एक प्रकरणातही त्याने तीला साथ दिलेली आहे. सलमान सर्वांचाच चाहता असल्यामुळे प्रीतीने थेट जोथपूर गाठून तुरुंगात जाऊन त्याची भेट घेतली.

सलमान खान याला काळवीट शिकारप्रकरणी झालेल्या शिक्षेवर त्याच्या चाहत्यांमध्ये आणि काही बॉलिवूड कलाकारांमध्ये नाराजी आहे. सलमान खानच्या घरी कलाकरांची रिघ लागली आहे. सोनाक्षी सिन्हापासून कतरिना कैफ पर्यंत सर्वजण सांत्वन करण्यासाठी सलमान खानच्या घरी येत आहे.
आज सकाळी सलमानला भेटण्यासाठी प्रीती झिंटा तुरुंगात पोहोचली होती. प्रितीने चेहऱ्या लपवण्यासाठी डोक्यावर टोपी घातली होती. जेलमधून बाहेर आल्यावर ती सरळ गाडीत जाऊन बसली आणि हॉटेलच्या दिशेने रवाना झाली. पण तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटीझन्सनी टीकेची झोड उडवली आहे. सलमानला जोधपूरला भेटण्यासाठी येणारी प्रिती ही पहिलीच सेलिब्रेटी आहे. ऐवढेच नाही तर काल ‘बागी2’ची सक्सेस पार्टीसुद्धा साजिद नाडियाडवालाने रद्द केली होती. सलमानसोबत त्याच्या दोन्ही बहिणी अलविरा आणि अर्पिता सातत्याने खंबीरपणे उभ्या आहेत.जामिनावरील सुनावणीच्या वेळी देखील त्या हजर होत्या.

प्रितीने सलमान सोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. चोरी चोरी चुपके चुपके’, ‘जानेमन’, ‘हीरोज’ आणि‘हर दिल जो प्‍यार करेगा’मध्ये प्रितीने सलमानसोबत अभिनय केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments