Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेनचा अपघात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेनचा अपघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांचा राजस्थानच्या कोटा-चितौड महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. जसोदाबेन यांना उपचारांसाठी चितौड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जसोदाबेन यांच्यावर उपचार सुरु असून हा घातपात होता की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

अपघातानंतर जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले ज्यानंतर जसोदाबेन पोलिसांसोबत त्यांच्या गाडीत बसून रूग्णालयात गेल्या. जसोदाबेन या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतात. त्याचसाठी त्या मथुरेत गेल्या होत्या आणि राजस्थानमध्येही एका सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी जसोदाबेन यांच्या कारला अपघात झाला. अपघातात जसोदाबेन यांचा मोठी दुखापत झाली नाही. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे समजते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments