Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेश'या' उद्योगपतीनं केला सात हजार कोटींचा महाघोटाळा!

‘या’ उद्योगपतीनं केला सात हजार कोटींचा महाघोटाळा!

नवी दिल्ली: दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यानंतर शेअर मार्केटपासून ते बँकींग सेक्टरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नीरव मोदीच्या महाघोटाळ्याची चर्चा सुरु असतांना नीरव मोदी यांच्याव्यतिरिक्त आणखी एका उद्योगपतीचा कारणामा समोर आला आहे. उद्योगपती जतिन मेहता या हिरे व्यापाऱ्याने सात हजार कोटी रुपयाचा चुना लावून फरार झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे किती उद्योगपतींनी बँकाँना ठगण्याचे काम केले अशी उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वे असतानाही पीएनबीने ११ हजार ५०० कोटींचे कर्ज कसे पास केलं? अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होत असातानाच पाच वर्षापूर्वी हिरे व्यापाऱ्याशी संबंध असलेल्या जतिन मेहता याच्या विनसम ग्रुपनेही बँकेमध्ये असा महाघोटाळा केला होता. त्यावेळी त्याने अशा डजनभर बँकेचे कर्ज चुकवू शकले नव्हते. त्याचा सर्वात मोठा झटका पीएनबीला बसला होता. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या अंडरटेकिंगवर डझनभर बँकेनं विनसमला सात हजार कोटींचे कर्ज दिले होते. यामध्ये पीएनबीनं १,८०० कोटींचे कर्ज दिले होते.

बँकिंग क्षेत्रातील सुत्रानुसार, त्यावेळी बँकांनी कंपनीला लेटर्स ऑफ क्रेडिट इशू दिलं होतं. हे पत्र एसबीएलसी इंटरनेशनल बुलियन बँकेला दिलं होतं. हि तीच बँक आहे जी विनसम ग्रुपनेच्या कंपनींना सोन्याची सप्लाय करत असे. विनसम ग्रुप कर्ज फेडू शकले नाही. त्यानंतर विनसम ग्रुपवर दबाव वाढला असता त्यांनी असे स्पष्ट केलं की, पश्चिम आशियामध्ये नुकसाण झालं आहे. त्यामुळं आम्ही पैसे नाही फेडू शकत. त्यावेळी भारतीय बँकांना मोठा झटका बसला होता. त्याप्रमाणेच आता पुन्हा पाच वर्षानंतर तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता नीरव मोदी यांनी तेच कारण पुढे केलं. नीरव मोदी याने भारतातून पळ काढला आहे. तर विनसम ग्रुपचे कुटुंबीय सिंगापूरमध्ये सध्या स्थाईक आहेत.

जतिन मेहता हा कोण आहे जाणून घेऊ या….
जतिन मेहता विनसम ग्रुप अँण्ड ज्वॅलेरी लिमिटेडचे मुख्य प्रवर्तक होते.. मेहता यांचा संबंध देशातील मोठ्या उद्योगपतींपैकी अदानी परिवाराशी आहे. जतिन मेहता यांच्यावर सात हजार कोटीं रुपये घेऊन पळ काढल्याचा आरोप आहे. २०१२ पासून तो फरार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments