राहुल गांधी चहापत्ती वेचणाऱ्या महिलांसोबतच बसले जेवायला! व्हिडीओ व्हायरल!

- Advertisement -
rahul-gandhi-food-with-tea-estate-workers-in-assam-dibrugarh-ahead-of-elections
rahul-gandhi-food-with-tea-estate-workers-in-assam-dibrugarh-ahead-of-elections

पुद्दुचेरी: पुद्दुचेरीमध्ये असताना राहुल गांधींनी स्थानिक मच्छीमार बांधवांसोबत गप्पा मारल्या होत्या. तिथेच पाण्यात सूर मारून मच्छिमारांसोबत पोहण्याचा आनंदही लुटला होता. एका शाळेत एका विद्यार्थिनीसोबत पुश-अप्स मारतानाचा राहुल गांधींचा व्हिडीओही बराच व्हायरल झाला होता. आता राहुल गांधींचा अजून एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. सध्या राहुल गांधी आसाममध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार करत असून प्रचारादरम्यान ते तिथेच चहापत्ती वेचणाऱ्या महिला मजुरांसोबत जेवायला बसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच, या मजूर महिलांसोबत गप्पा मारतानाचे त्यांचे व्हिडीओ देखील व्हायरल होऊ लागले आहेत.

 

आसाममध्ये २७ मार्च रोजी विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून २ मे रोजी निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या निवडणुकीसाठी राहुल गांधी सध्या आसाममध्ये प्रचारसभा घेत आहेत. दिब्रुगढमध्ये प्रचारसभा झाल्यानंतर तिथेच चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांसोबत राहुल गांधी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे जेवायला बसले. जेवतानाचा व्हिडीओ आणि फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर देखील पोस्ट केले आहेत.

- Advertisement -

“सर्वसामान्य हात सर्वात चविष्ट जेवण बनवतात. भूपेश बघेल आणि मी दिब्रुगढच्या चुबवामधल्या टी इस्टेटमध्ये तिथल्या कामगारांसोबत जेवणाचा आनंद लुटला”, असं राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भाजपा आणि आरएसएसवर साधला निशाणा!

दरम्यान, याआधी दिब्रुगढमधल्या आपल्या प्रचारसभेमध्ये राहुल गांधींनी भाजपावर आणि आरएसएसवर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला. “भाजपाला आसाममधला कारभार नागपूरमधून चालवायचा आहे. बाहेरच्यांनी इथे यावं आणि तुमच्या गोष्टी हिसकावून घ्याव्यात, अशी त्यांची इच्छा आहे. पण आम्हाला आसाममधूनच आसामचा कारभार हाकायचा आहे. आमचे मुख्यमंत्री आसामच्या जनतेचं ऐकून काम करतील. त्यांचा नागपूरशी काहीही संबंध नसेल”, अशा शब्दांत राहुल गांधींनी टीका केली आहे.

- Advertisement -