राजस्थानात पहिल्या तृतीयपंथी पोलीस कॉन्स्टेबलची नियुक्ती!

- Advertisement -

महत्वाचे…
१.राजस्थान पोलीस खात्यात कॉन्स्टेबलच्या पदावर पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाची नियुक्ती २. जालौर येथील रहिवासी तृतीयपंथी गंगाकुमारी हिची नियुक्ती ३. २०१३ साली १२ हजार पदांसाठी घेण्यात आलेल्या कॉन्स्टेबल भरती परिक्षेत पास


जोधपूर – राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजस्थान पोलीस खात्यात कॉन्स्टेबलच्या पदावर पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घटना राज्यात पहिली तर देशात तिसरी आहे. ज्यात एखाद्या तृतीयपंथीयाला सरकारी नियुक्ती मिळाली आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश मेहता यांनी जालौर येथील रहिवासी तृतीयपंथी गंगाकुमारी हिच्या याचिकेवरील सुनावणीत ६ आठवड्यात नियुक्ती देणे आणि २०१५ पासूनचे थकित देय रकमा देण्याचे आदेश दिले आहेत. गंगाकुमारी ही पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्र असूनही जालौर पोलीस अधिकाऱ्यांनी तिला नियुक्ती दिली नव्हती, असे याचिकाकर्त्याकडून अधिवक्ता रितुराज सिंह यांनी सांगितले आहे.
राणीवाडा ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जालौरची रहिवासी गंगाकुमारी हिची निवड २०१३ साली १२ हजार पदांसाठी घेण्यात आलेल्या कॉन्स्टेबल भरती परिक्षेत पास झाली होती. परिक्षेत राज्यभरातून जवळपास सव्वा लाख जणांनी भाग घेतला होता. पोलिसांनी यातील ११४०० जणांनी कॉन्स्टेबल पदासाठी निवड केली होती.

- Advertisement -

विभागात फिरत राहिली नियुक्तीची फाईल
मेडिकलमध्ये गंगा ही तृतीयपंथी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नियुक्ती करण्याच्या निर्णयावर पोलीस अधिकारी गोंधळात पडले. गंगा ही तृतीयपंथीय असल्याचे स्पष्ट झाल्यावर जालौर एसपीने फाईल रेंज आयजी जोधपूर जीएल शर्मा यांना पाठवून गंगाच्या नियुक्तीवर सल्ला मागितला. अशी घटना पहिल्यांदाच घडत असल्याने आयजीने ३ जुलै २०१५ ती फाईल पोलीस मुख्यालयात पाठवली होती. मात्र, येथेही पोलीस अधिकारी त्यावर निर्णय घेऊ शकला नाही. त्यानंतर पोलीस विभागाने त्यावर मार्गदर्शनासाठी ही फाईल पुढे गृह खात्याकडे रवाना केली.

- Advertisement -