जगातील पहिलीच घटना! सात जणांना ‘बर्ड फ्लू’ची लागण

russia-reports-worlds-first-case-of-human-infection
russia-reports-worlds-first-case-of-human-infection

नवी दिल्ली: कोरोनाचे संकट सर्वत्र घोंघावत असतांना आता कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच५एन८) माणसालाही धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांपासून बर्ड फ्लूचा माणसाला संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे.

रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना असून, या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे. त्यामुळे करोना पाठोपाठ आणखी एक नवं संकट उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रशियासह युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये बर्ड फ्लू’चा (एच५एन८) उद्रेक झाला आहे. मात्र, केवळ पोल्ट्री कोंबड्यांना या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत होतं.

मात्र, आता माणसालाही याचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. रशियात पहिल्यादाच बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. ग्राहक आरोग्य वॉचडॉक रोस्पोट्रेबनाडझोरचे प्रमुख अॅना पोपोवा यांनी रोशिया २४ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.

“अनेक दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या निष्कर्षांबद्दल निश्चित झालो होतो. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता नाहीत. मात्र, बर्ड फ्लूने संक्रमित जिवंत वा मृत कोंबडीच्या थेट संपर्कात आल्यानं संसर्ग होण्याची शक्यता असते.

त्यामुळे व्यवस्थितपणे शिजवून खालेलं अन्न सुरक्षित आहे. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे,” असं पोपोवा म्हणाल्या.

दक्षिण रशियात एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या सात कामगारांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये डिसेंबरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. मात्र, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली नाही, असं पोपोवा यांनी सांगितलं. वेगवेगळ्या देशात स्थलांतर करणाऱ्या पक्षांमुळे बर्ड फ्लूचा प्रसार वेगानं झाल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळे प्रत्येक देशाने पोल्ट्रीचे प्रकल्प बंदिस्त स्वरूपात किंवा स्थलांतर करणाऱ्या पक्षांचा संपर्क होणार नाही, अशा पद्धतीने करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here