Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशसंस्कृत शिकवणारा पहिलाच मदरसा!

संस्कृत शिकवणारा पहिलाच मदरसा!

sanskriti teacherमहत्वाचे…
१. दारुल उलूम हुसैनिया मदरशात संस्कृत,इंग्रजीचे धडे
२. मुस्लिम शिक्षकच देतात संस्कृतचे ज्ञान
३. उत्तर प्रदेशमध्ये संस्कृत शिकवणारा पहिलाच मदरसा


गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या दारूल उलूम हुसैनिया मदरसामध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा शिकवली जाते. ANI ला विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला संस्कृत शिकायला आवडतं. आमचे शिक्षक आम्हाला खूप चांगल्याप्रकारे संस्कृत शिकवतात. तसेच आमचे पालक देखील आम्हाला मदत करतात. 

मदरसामधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधुनिकतेशी जोडण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. मदरसामध्ये संस्कृतसोबतच इंग्रजी, गणित, अरबी, हिंदी आणि संस्कृत शिकवलं जात आहे.  असं म्हटलं जातं की, उत्तर प्रदेशमध्ये पहिला असा मदरसा आहे जिथे संस्कृत शिकवलं जातं. महत्वाची बाब म्हणजे या मदरसामध्ये संस्कृत शिकवणारे शिक्षक हे मुस्लिम आहेत.

दारूल उलूम हुसैनिया मदरसाचे प्रिंसिपल ANI शी बोलताना म्हणाले की, आम्हाला असं वाटतं की मदरसामधील मुलं कोणत्याही मुलांच्या मागे राहू नयेत. मदरसाची सुरूवात फक्त धर्माचा अभ्यास करण्यासाठी झालेला नाही तर समाजातील सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी झालेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments