Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेश२ तासांत ६ हत्या करणाऱ्या सायको किलरला बेड्या!

२ तासांत ६ हत्या करणाऱ्या सायको किलरला बेड्या!

महत्वाचे…
आरोपी सैन्यातील निवृत्त जवान २. पोलीस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या परिसरातच केल्या ६ हत्या ३. हरयाणातील पलवल शहर दोन तासांमध्ये सहा हत्या झाल्याने हादरले


पलवल, हरयाणा |  हरयाणातील पलवल शहर दोन तासांमध्ये सहा हत्या झाल्याने हादरले आहे. हल्लेखोराने अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही हल्ला केला असून यात पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. नरेश डांखड असे या आरोपीचे नाव आहे. तो सैन्यातील निवृत्त जवान असल्याची माहिती समोर येत आहेत. मात्र या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे.

पलवर परिसरात मंगळवारी पहाटे सायको किलरच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या परिसरातच सायको किलरने एक, दोन नव्हे तर सहा जणांची हत्या केली. यात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. माथेफिरु नरेश रुग्णालयात कसा पोहोचला हे अद्याप समजू शकलेले नाही. लागोपाठ सहा हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनीही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हातात रॉड घेऊन जाणाऱ्या हल्लेखोर दिसला. या आधारे पोलिसांनी  हल्लेखोराचा शोध सुरु केला. सकाळी साडे सहाच्या सुमारास पोलिसांना हल्लेखोर दिसला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही नरेशने हल्ला केला. यात पोलीस किरकोळ जखमी झाले. शेवटी बळाचा वापर करुन नरेशला ताब्यात घेण्यात आले. या झटापटीत नरेशही जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून सुटका झाल्यावर त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments