डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याने चिकनची ऑर्डर रद्द ; ग्राहकावर गुन्हा दाखल

- Advertisement -

swiggy muslim delivery boy
हैदराबाद : काही दिवसांपूर्वी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याने त्याच्याकडून जेवण घेण्यास नकार दिल्याची घटना ताजी असताना हैदराबादेत एका ग्राहाकाने स्विगी कंपनीच्या मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवणाचे पार्सल स्वीकारण्यास नकार दिला. तसेच ऑर्डरही रद्द केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक पी. श्रीनिवास यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्विगी कंपनीचा कर्मचारी मुदस्सर सुलेमान याच्या तक्रारीत म्हटले, आपण मुस्लिम असल्याने त्या ग्राहकाने जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिला. या प्रकरणी मुस्लीम संघटनेनेही हस्तक्षेप केला असून चिकनची ऑर्डर हिंदू डिलिव्हरी बॉयकडून पाठवण्याची त्याची मागणी होती. परंतु स्विगीने पार्सल मुस्लिम तरुणामार्फत पाठवले.

हा डिलिव्हरी बॉय स्विगी कंपनीत कामाला आहे. त्याने तक्रारीत म्हटले की, आलियाबाद उत्तर विभागात राहणाऱ्या एका व्यक्तीने स्विगीवर फलकनुमामधील ग्रँड बावर्ची रेस्टोरेंटमधून चिकन 65 ऑर्डर केले. ऑर्डर करताना त्यांनी म्हटले की, डिलिव्हरी बॉय हिंदू धर्माचा असावा. मुदस्सिरने ही घटना मुस्लिम संघटना मुस्लिम बचाओ तरहीकचे अध्यक्ष अमजद उल्लाह खान यांच्यापर्यंत पोहचवला. अमजद यांनी ग्राहकाची विनंती स्क्रीनशॉटसह संपूर्ण बोलणं ट्वीट केले आणि पोलिसांकडे तक्रार केली. पुढीत तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -