Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेश५ हजार EVM हॅकिंगची शक्यता : हार्दिक पटेल

५ हजार EVM हॅकिंगची शक्यता : हार्दिक पटेल

नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार असून, त्याआधीच पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने EVM मशिन हॅक होण्याचा आरोप केला आहे. “अहमदाबादमधील एका कंपनीतील १४० सॉफ्टवेअर इंजिनिअर ५ हजार EVM मशिनना सोर्स कोर्डच्या माध्यमातून हॅक करण्याच्या तयारीत आहेत”, असे ट्वीट हार्दिक पटेलने केले आहे.


“माझ्या विधानांवर तुम्हाला हसू येऊ शकतं, मात्र विचार कुणीच करणार नाही. इश्वराने बनवलेल्या या मानवी शरीराशी जर छेडछाड होऊ शकते, तर मानवाद्वारे बनवलेल्या EVM मशिनशी छेडछाड का होऊ शकत नाही? ATM हॅक होऊ शकतात, मग EVM का नाही?”, असे सवालही हार्दिक पटेलने उपस्थित केले आहेत.


हार्दिक पटेलने कालही EVM हॅकिंगवरुन भाजपवर गंभीर आरोप केले होते. काल हार्दिकने दावा केला होता की, “गुजरातचा निकाल जाहीर होण्याआधी भाजप EVM मध्ये छेडछाड करेल आणि असे करुनच भाजप जिंकेल. जर EVM मध्ये छेडछाड झाली नाही, तर भाजप ८२ जागांवरच गुंडाळेल.”


यासोबतच आणखी एक आरोप हार्दिक पटेलने काल केला होता. ”गुजरातमधील भाजपच्या पराभवाचा अर्थ म्हणजे भाजपचं पतन. ईव्हीएममध्ये घोळ करुन भाजप गुजरात जिंकेल आणि हिमाचल प्रदेशात पराभूत होईल, जेणेकरुन कुणीही प्रश्न उपस्थित करणार नाही”, असंही ट्वीट हार्दिकने केलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments