पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या कथित सेक्स व्हिडीओमुळे गुजरातमध्ये वादळ

- Advertisement -

महत्वाचे…
१.गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाची पातळी खालावली २. गुजरातमध्ये व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ३. व्हिडिओ मे महिन्यात शूट करण्यात आला


अहमदाबाद – गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाची पातळी खालावली आहे. गुजरातमध्ये भाजपाच्या नाकी नऊ आणणारा पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हार्दिक पटेलच्या विरोधकांकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर या व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती आपण नसून, मला बदमान केल्यास हरकत नाही, पण या व्हिडिओमधूम गुजरातमधील महिलांना बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप केला आहे.

सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेलसारखा दिसणार तरुण एका महिलेसोबत बंद खोलीत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तारखेवरून हा व्हिडिओ मे महिन्यात शूट करण्यात आलेला असण्याची शक्यता आहे. मात्र हार्दिकने या व्हिडिओत आपण असल्याचा आरोप हार्दिकने फेटाळला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ कुणी लिक केला याबाबत मात्र अद्याप  माहिती मिळालेली नाही.

- Advertisement -

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा माझी बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक आरोप पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं काही दिवसांपूर्वी केला होता.  ”मला बदनाम करण्यासाठी भाजपानं माझी बनवाट सेक्स सीडी बनवली आहे. ही सीडी बरोबर निवडणुकीपूर्वी जारी करण्यात येईल. याहून भाजपाकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणून प्रतीक्षा करा, पाहा आणि आनंद घ्या”. दरम्यान, सीडीबाबतची माहिती कशी समजली, असा प्रश्न हार्दिकला विचारण्यात आला तेव्हा हेच भाजपाचं वैशिष्ट्य आहे, असे त्याने म्हटले होते.

- Advertisement -