Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeदेशमोदींच्या ट्विटर हँडलवरून 'या' महिलेने केले पहिले ट्विट

मोदींच्या ट्विटर हँडलवरून ‘या’ महिलेने केले पहिले ट्विट

Sneha Mohandoss Food Bank Cheenaiनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार आज जागतिक महिला दिनानिमित्त आपले सोशल मीडिया अकाउंट महिलांकडे सोपवले आहे. त्यानुसार स्नेहा मोहन दास यांनी ट्विटरवर @narendramodi या हँडलवरून सर्वप्रथम ट्विट केले आहे. आपण फूड बँकेच्या संस्थापक असल्याची माहिती त्यांनी या ट्विटद्वारे दिली आहे.

स्नेहा मोहनदास यांनी सन २०१५ मध्ये चेन्नईत पूर येण्यापूर्वी फूड बँकेची स्थापना केली होती. भुकेशी लढणे आणि भारतात कुणीही भुकेला राहणार नाही हे पाहणे हाच या फूड बँकेचा उद्देश असल्याचे स्नेहा मोहनदास यांनी सांगितले. माझ्या आजोबांच्या जन्मदिनानिमित्त माझी आई मुलांना बोलावून त्याना जेवण देत असे. हे काम पुढे नेण्याची माझा संकल्प होता. यातूनच फूड बँकेची कल्पना पुढे आल्याचे त्या सांगतात.

या व्हिडिओद्वारे स्नेहा यांनी आपल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. फेसबुकद्वारे लोकांशी जोडले जात आपण फूड बँकेसाठी काम करतो, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी फूड बँक चेन्नई या नावाने फेसबूक पेज तयार केले. तसेच त्यांनी लोकांना आपापल्या राज्याच्या, शहरांच्या नावाने फूट बँकेचे पेज तयार करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर भारतात अशा प्रकारे १८ ठिकाणी फूड बँक सुरू झाल्या. या बरोबच एक फूड बँक दक्षिण आफ्रिकेतही सुरू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments