Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशउत्तरप्रदेश: पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू मारहाणीमुळेच

उत्तरप्रदेश: पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू मारहाणीमुळेच

uttar pradesh, rapeत्तरप्रदेशउत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या महिलेच्या वडिलांचा मृत्यू हा तुरुंगात पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला आहे. त्यांच्या अंगावर १४ ठिकाणी मारहाण झाल्याचा शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. बलात्कार प्रकरणी आमदाराच्या भावाला अटक करण्यात आली. मात्र आमदार कुलदीप सेंगरला अटक करण्यात यावी अशी मागणी पिडितेच्या कुटुंबियांनी केली आहे.

आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर या महिलेच्या पित्याला पोलिसांनी काल अटक केली होती. मात्र पोलिस कोठडीत तरुणीच्या वडिलांचा मृत्यू झाला. हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले आहे. आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनीच पीडितेच्या वडिलांची हत्या घडवून आणली असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला होता. पोलिसांनी रविवारी रात्री पीडित महिलेच्या पित्याला उन्नाव जिल्हा रूग्णालयात आणलं होतं. सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला झाला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज अहवालातून पीडितेच्या वडिलांच्या अंगावर १४ ठिकाणी जखमा आढळल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. ३ एप्रिल रोजीही आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना मारहाण केली होती. असाही आरोप करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments