Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडाप्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसन करावे - जी. श्रीकांत

प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसन करावे – जी. श्रीकांत

लातूर : जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांचे कार्यालयामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजने बाबत तालूका चाकूर अंतर्गत वडवळ नागनाथ, तालूका उदगीर अंतर्गत वाढवण बू. व नळगीर, लातूर तालूक्यातील तांदूळजा महसूल मंडळातील तसेच रेणापूर तालूक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर श्री.एस.बी. आळसे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक पस्तापूरे, भारतीय कृषि विमा कंपनी प्रतिनिधी भोसले व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहाय्यकं व्यवस्थापक श्री राजेश मूळे व बँक अधिकारी देशमूख तसेच कृषि विभागाचे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन पिक विमा योजनेच्या अनुशंगाने संकलन तक्ते व दस्तंऐवज अवलोकन करुन मा. जिल्हाधिकारी यांनी वडवळ नागनाथ महसूल मंडळातील शेतकरी सतत 3 वर्षापासून पिक विमा भरपाई पासून वंचित आहेत. याबाबतची फेरपडताळणी करुन वस्तूस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
पिक विमा कंपनीने रब्बी 2017 मधील पात्र ठरलेल्या हरभरा पिकाची विमा व गारपीठ ग्रस्तं शेतकऱ्यांचा विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणेची कार्यवाही कराणे बाबत सूचना दिल्या. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप 2018 मधील मंजूर पिक विमा तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या तूर व कापूस पिकाच्या पिक विमा नुकसान भरपाई गणना करुन पात्र शेतकऱ्यांची पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करावी व नुकसान भरपाई अदा करताना निवडणूक आचार संहितेचे पालन करावे याबाबत सूचना दिल्या.
पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीवर वेळीच मार्गदर्शन केल्यास व मंजूर दावे तात्काळ अदायगी केल्यास व त्याची माहिती वर्तमान पत्र व इतर प्रसार माध्यमांचा वापर करुन शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचविल्यास गैरसमजूतीमधून झालेल्या तक्रारी कमी होतील. तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या नुकसान भरपाई निश्चित करण्याची पध्दतीची माहितीसंबंधी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन केले.
तंत्र अधिकारी सांख्यिक नितिन कांबळे यांनी याबाबतची तांत्रीक माहिती उपलब्धं करुन दिली तसेच कृषि उपसंचालक व्ही.बी. सरोदे यांनी उपस्थित सर्वांची आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments