Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeक्रीडारोहितचा डबल धमाका

रोहितचा डबल धमाका

मोहाली: विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या रोहित शर्माने बुधवारी नवा इतिहास रचला. त्याने १५३ चेंडूत नाबाद २०८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे एकदिवसीय प्रकारात तीन द्विशतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. रोहितच्या या सुवर्ण कामगिरीला एका योगायोगामुळे आणखी झळाळी लाभली. रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. त्यामुळे रोहितची आजची अविस्मरणीय खेळी रितिकासाठी खास भेट ठरली.

रोहित शर्माने द्विशतक झळकावल्यानंतर ‘वेडिंग रिंग’च्या बोटाचे चुंबन घेऊन रितिकाला फ्लाईंग किसही दिला. यावेळी सर्व कॅमेरे रोहित शर्मा आणि रितिका यांच्यावर खिळले होते. त्यामुळे आता सोशल मीडियावर ‘विरुष्का’नंतर रोहित आणि रितिका दोघेही चर्चेचा विषय ठरत आहेत.

या सामन्यात रोहितने सुरुवातीला संयमी खेळी केली. मॅथ्यूजच्या पहिल्या षटकात त्याने एकही धाव घेतली नाही. मात्र, त्यानंतर रोहितने धावांची अक्षरश: लयलूट केली. त्याच्या २०८ धावांच्या खेळीत १३ चौकार १२ षटकारांचा समावेश आहे. यावरून रोहितने लंकन गोलंदाजांची किती धुलाई केली असेल याची कल्पना येऊ शकते. अखेरच्या काही षटकांमध्ये लंकेचे गोलंदाज रोहित शर्मासमोर पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसत होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ३९२ धावांचा डोंगर रचला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments