Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडा१८ चेंडूत कोलिनने झळकावलं अर्धशतक

१८ चेंडूत कोलिनने झळकावलं अर्धशतक

नवी दिल्ली – न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज कोलिन मुन्रोनं १८ चेंडूत ५० धावा करत 2018ची दमदार सुरुवात केली. यावेळी त्यानं सात चौकार आणि तीन षटकार ठोकले. वेस्ट इंडिजविरोधात सुरु असलेल्या २०१८ या वर्षातील पहिल्या टी-20 सामन्यात कोलिन मुन्रोनं हा पराक्रम केला. 

वेस्ट इंडिजविरोधात सुरु असेल्या टी-20 सामन्यात मुन्रोनं २३ चेंडूत ११ चौकार आणि तीन षटकारांसह २८६ च्या स्ट्राइक रेटनं ६६ धावा पटकावल्यात. यावेळी त्यानं फक्त चार वेळा एकेरी धाव घेतली. त्याबरोबरच २०१८ मध्ये पहिलं अर्धशतक मुन्रोच्या नावावर जमा झालं आहे. त्याचप्रमाणे मुन्रोनं जगातील सहावे तर न्यूझीलंडकडून दुसरे जलद अर्धशतक झळकावलं. मुन्रोच्याआधी गेल (१७ चेंडू),  मायबर्घ (१७ चेंडू), स्टर्लिंग (१७ चेंडू), मुन्रो (१४ चेंडू) आणि युवराज सिंह (१२ चेंडू) यांनी जदल अर्धशतक ठोकली आहेत. न्यूझीलंडकडून सर्वात जलद अर्धशतक मुन्रोच्याच नावावर आहेत. २०१६ मध्ये मुन्रोनं लंकेविरोधात १४ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर मार्टिन गप्टिल आहे. गप्टिलनं २०१६ मध्येच लंकेविरोधात १९ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. दरम्यान, सध्या पावसाच्या व्यत्ययामुळं सामना थांबवण्यात आला आहे. खेळ थांबला त्यावेळी न्यूझीलंडनं नऊ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात १०२ धावा केल्या आहेत. कर्णधार केन विल्यमसन १७ आणि एके. किचन एक धावांवर खेळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments