Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeक्रीडाक्रिकेटच्या देवाचा आज ४५ वा वाढदिवस

क्रिकेटच्या देवाचा आज ४५ वा वाढदिवस

Sachin Tendulkar, mumbai, Birthday, Cricketमुंबई: आपल्‍या खेळाने जगातील चाहत्यांचे मने जिंकणारा, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा आज ४५ वा वाढदिवस. हजारो चाहत्यांचा तो आजही देवच आहे. २४ एप्रिल १९७३ ला रमेश तेंडुलकर आणि रजनी तेंडुलकर यांच्या पोटी हे रत्‍न जन्माला आले आणि पुढे आपल्‍या बहारदार कर्तृत्‍वाने क्रिकेटचा देव झाला. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अनेक चाहते आज त्‍याचा वाढदिवस उत्‍साहात साजरा करत आहेत.  

लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या सचिनने १९८९ साली वयाच्या अवघ्‍या १६ व्या वर्षी क्रिकेट मैदानावर पाऊल टाकले आणि त्या पावलाने अवघे क्रिकेटविश्‍व सहज पादाक्रांत करून विक्रमांचे एव्हरेस्ट रचले. सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला.

सचिनचे  असेही विक्रम… 

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८ हजार ४२६ धावा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक ४९ शतके.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक ९६ अर्धशतके

कसोटी कारकिर्दीमध्ये सर्वाधिक १५ हजार ५३३ धावा.

बारा हजार कसोटी धावांचा पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.

दहा हजार कसोटी धावांचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये गाठण्यात संयुक्त प्रथम स्थान. तेंडुलकर व ब्रायन लारा या दोघांनीही १९५ डावांमध्ये हा पल्ला गाठला.

कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा भारतीय विक्रम सचिनच्या नावावर आहे : २१७ धावा (न्यूझीलंडविरुद्ध १९९९-२०००).

कसोटी दर्जा प्राप्त असलेल्या सर्व संघांविरुद्ध शतके काढण्याचा पराक्रम करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला भारतीय तर तिसरा जागतिक फलंदाज.

परदेशांमध्ये झालेल्या कसोट्यांमध्ये सर्वाधिक ८,७०५ धावा काढणारा जागतिक फलंदाज

परदेशांमध्ये झालेल्या कसोट्यांमध्ये सर्वाधिक २९ शतके झळकविणारा जागतिक फलंदाज

एका वर्षात १००० धावा अशी कामगिरी सर्वाधिक वेळा करणारा जागतिक फलंदाज : सहा वेळा. १९९७ (१००० धावा), १९९९ (१०८८ धावा), २००१ (१००३ धावा), २००२ (१३९२ धावा), २००८ (१०६३ धावा), २०१० (१५६२ धावा).

कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज.

कसोटी कारकिर्दीत दीडशेचा पल्ला सर्वाधिक वेळा गाठणारा जागतिक फलंदाज.

भारतीय कसोटी इतिहासात सचिन तेंडुलकर हा सर्वात कमी वयात शतक झळकविणारा फलंदाज.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments