लक्ष्मणने ब्रिस्बेनमध्ये भारत जिंकल्याचा सांगितला ‘तो’ किस्सा

- Advertisement -

नवी दिल्ली: गाबामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटी मालिका २-१ ने जिंकली, त्यावेळी माझ्या डोळयात अश्रू तरळले असे माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मणने सांगितले. भारताने ऑस्ट्रेलियाचा किल्ला भेदला व ३२ वर्षात ब्रिस्बेनच्या मैदानावर विजय मिळवणारा भारत पहिला संघ ठरला. ऋषभ पंत, शुबमन गिल आणि चेतेश्वर पूजारा अंतिम कसोटीतील भारताच्या विजयाचे नायक ठरले. ऑस्ट्रेलियाचे ३२८ धावांचे लक्ष्य पार करुन भारताने बॉर्डर-गावसकर करंडक आपल्याकडेच राखला.

कुटुंबीयांसोबत शेवटच्या दिवसाचा खेळ पाहत असताना, मी खूपच भावनिक झालो होतो. ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर खेळपट्टीवर असताना, मी खूपच तणावाखाली होतो. कारण जेव्हा तुम्ही स्वत: खेळत नसता, तेव्हा तुमचे स्वत:वर नियंत्रण नसते.

“भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून मालिका जिंकावी, एवढीच माझी इच्छा होती. कारण अ‍ॅडलेडमध्ये जे घडलं आणि गाबा कसोटीआधी जे सुरु होतं, भारतीय संघ ब्रिस्बेन जायला घाबरतोय, कारण तिथे अजूनपर्यंत ऑस्ट्रेलियाचा पराभव झालेला नाही, अशी चर्चा सुरु होती.

- Advertisement -

भारताने काहीही करुन ही मालिका जिंकावी अशीच माझी इच्छा होती” असे लक्ष्मण बोरीया मुजुमदार यांच्यासोबत स्पोर्टस टुडेशी बोलताना सांगितले. व्हीव्हीएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेहमीच सरस खेळ केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याची सरासरी ५० होती. अ‍ॅडलेडमध्येच तो त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला.

- Advertisement -