Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeक्रीडाIND vs WI : तिसरा आणि निर्णायक वनडे आज

IND vs WI : तिसरा आणि निर्णायक वनडे आज

IND VS WI 3rd one day matchकटक : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरी आणि अखेरची वनडे कटक येथे आज खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने तर दुसरा टीम इंडियाने जिंकल्यामुळे अखरेचा सामना निर्णायक ठरणार आहे.   तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

चेन्नईच्या पहिल्या वन डेत विंडीजने भारतीय संघाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. तर विशाखापट्टणमध्ये भारतानं 87 धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती. त्यामुळे कटकचा हा सामना मालिका विजयाच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार आहे.

हिटमॅन रोहितला २२ वर्षापूर्वीचा विक्रम मोडण्याची संधी

या वर्षभरात एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर १ हजार ४२७ धावा झाल्या आहेत. यात ७ शतकांचा समावेश आहे. तर कर्णधार विराट कोहलीच्या नावावर १ हजार ४६० धावांची नोंद आहे. विराटने २०१७मध्ये १ हजार ४६० धावा केल्या होत्या. जर या सामन्यात रोहितने ३४ धावा केल्या तर तो एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे.

याशिवाय रोहितने ९ धावा काढल्या तर तो श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा २२ वर्ष जुना विक्रम मोडू शकतो. रोहितला सलामीवीर म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून २०१९मध्ये रोहितने २ हजार ३७९ धावा केल्या आहेत. तर जयसूर्याने १९९७मध्ये २ हजार ३८७ धावा केल्या होत्या.

कुलदीप हि वन डेत शतक पूर्ण करणार

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्या हॅट्टिक घेणाऱ्या कुलदीप यादव याला वनडे क्रिकेटमध्ये १०० विकेट घेण्यासाठी केवळ एका विकेटची गरज आहे. या सामन्यात १ विकेट घेतल्यास तो विकेट घेण्याचे शतक पूर्ण करेल.

तिसऱ्या वन डे सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, रवींद्र जाडेजा, केदार जाधव, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मनीष पांडे, ऋषभ पंत, केएल राहुल.

तिसऱ्या वन डे सामन्यासाठी संभाव्य वेस्टइंडिज संघ 

कायरन पोलार्ड (कर्णधार), सुनील अॅम्ब्रिस, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, अल्जारी जोसेफ, ब्रेंडन किंग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, इविन लुईस, किमो पॉल, खॅरी पियर, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, हेडन वॉल्श.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments