भारताला पहिला धक्का, शिखर धवन झेलबाद

- Advertisement -

कानपूर- न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील अंतिम लढतीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या उद्देशानं खेळतो आहे. कानपूरला सुरू असलेल्या तिसऱ्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.

सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांनी भारताच्या डावाला चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र, सातव्या षटकात टीम साऊदीने भारताला पहिला धक्का दिला. शिखर धवनला त्याने १४ धावांवर झेलबाद करून माघारी धाडले आहे. भारतीय फलंदाजांनी अर्धशतक पूर्ण केलंय.

- Advertisement -