Placeholder canvas
Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाBCCI मध्ये आजपासून 'दादा'गिरी

BCCI मध्ये आजपासून ‘दादा’गिरी

sourav ganguly BCCI president,Sourav, Ganguly,BCCI,President

नवी दिल्ली: क्रिकेटच्या विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने आज बुधवारी BCCI चे अध्यक्षपद स्वीकारले. १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला होता. आज सौरव गांगुलीने BCCI च्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. त्यामुळे आजपासून BCCI च्या ‘दादा’गिरी दिसणार आहे.
sourav ganguly as BCCI President,Sourav, ganguly,BCCI,President
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली. सौरव गांगुली यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही आजच होणार आहे. गांगुलीसोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह याने BCCI च्या सचिवपदी निवड करण्यात आली. BCCI चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांची BCCI च्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments