Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाईडन गार्डनवर बेल वाजवण्याची काय आहे परंपरा, ती कोठून आली ?

ईडन गार्डनवर बेल वाजवण्याची काय आहे परंपरा, ती कोठून आली ?

What is the tradition of Bell ringing ceremony on the eden gardens cricket stadium
भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. इंदूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा एक डाव व 130 धावांनी पराभव केला. मालिकेचा दुसरा सामना कोलकाता येथे 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. २२ नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश असा ‘डे-नाइट’ कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे.

बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांचे होम पिच म्हणजेच ईडन गार्डन स्टेडियम. ईडन गार्डन मध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये एक विशेष सोहळा पार पाडला जातो, हा सोहळा बेल वाजवण्याचा आहे. म्हणजे बेल रिंगिंग सेरेमनी .

या विशेष सोहळ्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या कार्यक्रमात उपस्थित असतील. दोघेही हा सोहळा पूर्ण करतील.

ईडन गार्डन स्टेडियम वर घंटी वाजवण्याचा सोहळा कधी सुरू झाला?

इंग्लंडमध्ये लॉर्ड्स नावाचे एक प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम आहे. याला क्रिकेटचा मक्का देखील म्हणतात. सर्व प्रथम, हा सोहळा येथे सुरू झाला. हा सोहळा (Ringing of five minute bell) ‘पाच मिनिटांची बेल वाजवणे’ म्हणून ओळखला जातो.

स्टेडियमच्या अधिकृत वेबसाइटनुसार,

ह्या सोहळ्याची सुरवात 2007 मध्ये लॉर्ड्स स्टेडियम वर झाली. या सोहळ्याची सुरुवात सर विव्हियन रिचर्ड्स यांच्या सोबत बीबीसी टेस्ट मॅचचे माजी निर्माता पीटर बॅक्सटर यांनी केली होती. नवाब पटौदी आणि सुनील गावस्कर हा सम्मान मिळवणारे पहिले भारतीय होते.

क्रिकेटपटू व्यतिरिक्त क्रिकेटशी संबंधित अनेक सेलिब्रिटींना हा मान मिळाला आहे .यात प्रसिद्ध छायाचित्रकार पॅट्रिक एगर, पंच डिकी बर्ड, ब्रॉडकास्टर हेनरी ब्लॉफेलड, जमैकन ऑलिम्पियन योहान ब्लेक, लेखक स्टीफन फ्राय अशी दिग्गज नावे आहेत.

हा सोहळा कोलकाता येथे कधी पोहोचला

2016 मध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाने भारत दौरा केला होता. या दौर्‍याचा दुसरा कसोटी सामना कोलकाता येथे खेळला गेला. घरच्या मैदानावर हा भारताचा 250वा क्रिकेट कसोटी सामना होता. या कसोटी सामन्या वेळी प्रथमच कोलकाता ईडन गार्डन स्टेडीयमवर बेल वाजविण्यास सुरुवात झाली.

पूर्व भारतीय कर्णधार कपिल देव यांना ईडन गार्डन्स स्टेडीयमचा घंटा वाजवण्याचा पहिला मान मिळाला. त्यानंतर मायकेल क्लार्क, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन आणि विराट कोहली या दिग्गजांनी ही परंपरा पारपाडली आहे. टेस्टसह ईडन गार्डनवर क्रिकेटच्या इतर फॉर्मेट्स मध्ये हि घंटा वाजवण्याची प्रथा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments