झहीर, सागरिका आज अडकले लग्नाच्या बेडीत

- Advertisement -

भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे आज लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांनीही झहीरच्या लोअर परळ येथील घरी नोंदणी पद्धतीने लग्न केले आहे. झहीरची मैत्रीण अंजना शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या दोघांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. हो फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून झहीर व सागरिकाच्या चाहत्यांनी त्यांना वैवाहीक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सागरिकाने लग्नाच्यावेळी लाल रंगाची साधी साडी घातली आहे. या साडीसोबत तिने कोणतेही भरजरी दागिणे न घालता रस्टी लूकचा मेटलचा हार घातला आहे. या साध्या लूकमध्येही सागरिका खूप सुंदर दिसत आहे. तर झहीरने देखील हलक्या गुलाबी रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे.

झहीर आणि सागरिकाने लग्न किंवा निकाहला फाटा देत थेट विवाह नोंदणी पद्धतीने लग्न केले आहे. लग्नानंतर संध्याकाळी झहीरने काही खास व्यक्तींसाठी कॉकटेल पार्टी ठेवली आहे.

- Advertisement -

झहीर आणि सागरिकाने लग्न जरी नोंदणी पद्धतीने केले असले तरी मेहेंदी, संगीत व रिसेप्शन असे कार्य़क्रम देखील होणार आहेत. त्यांचे रिसेप्शन २७ नोव्हेंबरला ताजमहल पॅलेसमध्ये होणार आहे.

- Advertisement -