Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeलाईफस्टाइलगुगलचं हे अ‍ॅप टिक टॉकवर पडणार भारी

गुगलचं हे अ‍ॅप टिक टॉकवर पडणार भारी

Google's this app will be heavy on Tick Talk
सर्वत्र टिक-टॉकची मोठ्या प्रमाणात क्रेझ वाढली असून, टिक टॉकच्या या अ‍ॅपने ब-याच तरुण तरुणींना यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. टिकटॉकचा वाढता वापर इतर मोठ्या कंपन्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. फेसबुकनंतर गुगलही टिकटॉकला मात देण्यासाठी नवीन अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे.

स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. चीनची कंपनीसुद्धा खरेदीच्या विचारात आहे. गुगलबरोबरच चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Weibo सुद्धा फायरवर्क खरेदी करण्याच्या विचारात आहेत. मात्र, फायरवर्क खरेदी करण्याच्या शर्यतीत गुगल इतर कंपन्यांच्या पुढे आहे.

टिकटॉक पेक्षा अधिक आहे फायरवर्कची किंमत मागच्याच महिन्यात फायरवर्कनं भारतात एन्ट्री केली आहे. फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला १०० मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला आहे. तर, टिकटॉकची सहयोगी कंपनी बाइटडान्सनं ७५ मिलियन डॉलर आहे. शॉर्ट व्हिडिओ मोकिंग आणि शेअरिंगसाठी असलेले हे अ‍ॅप टिकटॉकपेक्षा वेगळं आहे.

फायरवर्क युजर्स ३० सेकंदाचा व्हिडिओ बनवू शकतो. टिकटॉकमध्ये फक्त १५ सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवता येऊ शकतो. तसंच, युजर्स व्हर्टिकल व्हिडिओसोबतच हॉरिजॉन्टल व्हिडिओसुद्धा शूट करू शकतो. फायरवर्क अ‍ॅप अँड्रोइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे अ‍ॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या १०लाखांपेक्षा अधिक आहे. भारतातही फायरवर्क अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा कंपनीनं केला आहे.

सोशल मीडिया कंपनी फेसबुकसुद्धा युजर्समध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंगची वाढलेली क्रेझ पाहून एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. मागच्य वर्षी नोव्हेंबर महिन्यात lasso नावाचं एक अ‍ॅप फेसबुकनं लाँच केले आहे. फेसबुकचं हे लेटेस्ट अ‍ॅप सध्यातरी फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे. टिकटॉकसारखेच या अ‍ॅप चेदेखील फिचर आहेत.

दरम्यान, भारतात टिक टॉक अ‍ॅप चा गैरवापर करण्यात येत आहे. टिक टॉक अ‍ॅप मध्ये अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येत असल्याने या अ‍ॅप वर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली होती. टिक टॉकचे १२ कोटी यूजर्स असून बंदीनंतर या अ‍ॅप वरील सुमारे ६० लाख व्हिडिओ डिलिट करण्यात आले होते. बंदीमुळे २५० नोकऱ्याही धोक्यात आल्या होत्या. मात्र, कालांतराने न्यायालयाने टिक टॉकवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गुगलच्या अ‍ॅप मुळे तरुण तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments