Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeलाईफस्टाइलतुळशी विवाह समारंभ

तुळशी विवाह समारंभ

tulsi vivah
हिंदू धर्मात दिवाळीच्या सणानंतर काही दिवसांत तुळशी विवाह करण्याची पद्धत आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला सुरुवात होते. तुळशी विवाह पार पडला की, लग्नाच्या तारखा काढायला सुरुवात होते.

वृंदावन सोसायटी, लालबाग येथे तुळशीविवाह अगदी सुंदर आणि थाटात साजरा केला जातो. तिथलीच मीही एक रहिवासी आहे.

दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या पहिल्या दिवशी पारंपारिक पोशाखात एक लहान मुलगा सोसायटीतील आपल्या मित्रांसह, आपल्या लग्नासाठी आमंत्रित करण्यासाठी एका गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांच्या फ्लॅटला भेट देतो. ‘सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये माझ्या लग्नाच्या समारंभास सहभागी होण्याची मी तुम्हाला विनंती करतो.’ असं म्हणत म्हणत तो सर्वाना आमंत्रण देतो.

हा सोहळा दरवर्षी दिवाळीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. जवळ जवळ ३० वर्षांपासून लालबाग येथील जयहिंद टॉकीजच्या समोरील सोसायटीत एका विवाह विधीचे पालन करून हा सण साजरा केला जातो.

सोसायटीच्या सदस्यांकडून , महिन्यापूर्वीच या दिवसाची तयारी सुरू करतात. या दिवशी तुळशी शी लग्न करण्याची इच्छा असलेल्या आपल्या मुलाचे नाव नोंदविण्यासाठी पालक पुढे येतात.

दरवर्षी पहिल्या दिवशी लोकांना आमंत्रण देण्यासाठी सोसायटीच्या आवारात आमंत्रण पत्र्याचे पोस्टर लावण्याची त्यांची परंपरा आहे. पहिल्या दिवशी सकाळी, वराला आपल्या मित्रांसह सोसायटीच्या प्रत्येक सदस्याच्या घरी आमंत्रण पत्र घेऊन त्यांच्या लग्नासाठी आमंत्रित केले जाते. दिवाळीच्या सुरु होण्याआधीच दोन दिवस अगोदरच सोसायटी आकाशकंदील ने प्रकाशित झालेली दिसत असते. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठीही बसण्याची व्यवस्था चोक बजावतात

सोसायटीत इतर १०० कुटुंबांसह हा उत्सव साजरा करण्याची परंपरा सन १९९० मध्ये स्थापन केली गेली होती. खरंच, पूर्वी ज्या पिढीने हा विधी सुरू केला होता त्या सर्व परंपरा आणि विधी पुढच्या पिढीपर्यंत पोचवल्या गेल्या आहेत, आणि त्यांचं पालनही होत आहे याची मला खात्री करून घेतली आहे. वयस्कर माणसांसोबत किशोरवयीन मुलेही उत्साहाने सहभागी होतात.

हिंदू लग्नाच्या हंगामाच्या सुरूवातीला सूचित करण्यासाठी तुळशी विवाह साजरा केला जातो. लोक तुळशीच्या झाडाच्या जवळपासचे क्षेत्र सजवतात. हा सण साजरा करताना, वधू म्हणून सुशोभित केलेला मानवी चेहरा / आकृती वनस्पतीशी जोडलेली जाते. आणि ज्याच्याशी तिचे लग्न आहे तो वर भगवान श्रीकृष्ण मानला जातो.

लहानपणापासूनच हा उत्सव मी बघत आले आहे. “सोसायटीचे सदस्य त्यांच्या इच्छेनुसार योगदान देतात आणि अतिरिक्त खर्चावर मात करण्यासाठी प्रायोजक शोधत असतात. आमच्या समाजाच्या परंपरेने जवळपासच्या इतर समाजांना देखील प्रोत्साहित केले आहे. खरंच आपली महाराष्ट्रीयन परंपरा जिवंत ठेवण्यासाठी अशाप्रकारचे सर्व सण आणि उत्सव साजरा करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments