Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअमित शहांनी, पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

अमित शहांनी, पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलावर गंभीर आरोप झाल्याने नैतिकतेच्या पातळीवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन   केली आहे.

अमित शहांचा मुलगा जय याची टेम्पल कंपनी तोट्यातून एका वर्षात नफ्यात गेली तीही ८० कोटींच्या यावरून अमित शहा चांगलेच अडचणीत आले आहेत.

बंगारू लक्ष्मण, लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरी हे भाजप पक्षाध्यक्ष असताना त्यांच्यावर आरोप होताच त्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे अमित शहांनी हे पाऊल उचलले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. अमित शहांच्या मुलाच्या कंपनीची वाढ १६ हजार पटीने होणे हे देशातील क्रोनी कॅपिटीलीजमचा उत्तम नमुना आहे असा आरोपही चव्हाण यांनी केला.

अमित शहांचा मुलगा जय याची टेम्पल कंपनी तोट्यातून एका वर्षात नफ्यात गेली तीही ८० कोटींच्या यावरून अमित शहा चांगलेच अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शहांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अमित शहा यांचा मुलगा जय याची टेम्पल कंपनी नोटबंदीच्या एक महिना आधी बंद केली. मनी लाँड्रिग करणा-या कंपन्या मोदींनी नोटबंदी केल्यानंतर हळू हळू बंद पडत गेल्या. मात्र, अमित शहांच्या मुलाने एक महिना आधीच त्याची कंपनी बंद केली. याचा अर्थ जय शहा यांना नोटबंदी होणार याची माहिती होती. अमित शहांच्या आदेश व निर्णयाशिवाय असे होऊ शकत नाही. सोबतच कुसुम फिनसर्व या जय शहा यांच्या कंपनीला अनुभव नसताना निरमा ग्रुपने २५ कोटी कर्ज दिले. या कंपनीत यशपाल चुडासम भागीदार आहेत. हेच चुडासम सोहराबुद्दीन एन्काउंटरमध्ये आरोपी होते. शिवाय अनुभव नसताना या कंपनीला ऊर्जा मंत्रालयाने २५  कोटी रूपयांचे कर्ज दिले. या सर्व घडामोडीत राजकीय ताकदीचा वापर केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नैतिकतेच्या पातळीवर अमित शहांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

पृथ्वीबाबा पुढे म्हणाले, यापूर्वी भाजपाध्यक्षांवर जेव्हा जेव्हा आरोप झाले तेव्हा तेव्हा त्या त्या पक्षाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. मग ते बंगारू लक्ष्मण असो की लालकृष्ण अडवाणी. नितीन गडकरी यांच्यावरही २०१२-१३ मध्ये जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी पक्षाध्यक्षपद सोडले होते. एकूनच अमित शहांचे प्रकरण हे राजकीय ताकदीचा गैरवापर आणि क्रोनी कॅपिटीलीजमचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments