Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिकनाशिक कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या

नाशिक कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या

नाशिक : खूनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातजन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तरप्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत मोहनगिरी गुरुजी दयागिरी उर्फ गौतम काशिनाथ जोशी (७१, मूळ, राहणार आवाहन आखाडा, ता़हलदर, जि़ सुरेंद्रनगर, उत्तरप्रदेश) यांनी गुरुवारी (दि़१२) मध्यरात्री चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील किनवट पोलीस ठाण्यात २००४ मध्ये महंत मोहनगिरी जोशीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यात न्यायालयाने महंत जोशी यास १२ वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती़ गत दहा ते बारा वर्षांपासून मोहनगिरी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते़ त्यांचा बंदी क्रमांक पी़७१ असा होता़.

महंत मोहनगिरी जोशी या बंदीवानाने गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातील रुग्ण विभागातील शौचालयात आपल्याकडील चादर फाडून स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ ही बाब लक्षात येताच तत्काळ उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले़ महंत म्हणून ओळख असलेले मोहनगिरी यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना खुल्या कारागृहात ठेवलेले होते़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments