पत्नीच्या डोक्यात कु-हाडीने वॉर करुन हत्या!

- Advertisement -

आर्णी (यवतमाळ ) : क्षुल्लक कारणावरून झालेल्या घरगुती वादात पत्नीवर कु-हाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना आर्णी तालुक्यातील कोसदनी येथे रविवारी सकाळी ६.३० वाजता घडली. घटनेनंतर आरोपी पती पसार झाला आहे. सीमा प्रमोद बोडखे (२५) असे मृत महिलेचे नाव आहे. पिंटू उर्फ प्रमोद भाऊराव बोडखे (३०) असे आरोपी पतीचे नाव आहे.

रविवारी सकाळी ती थंडी असल्याने शेकोटीजवळ उब घेत होती. त्यावेळी पती पिंटू तेथे आला. त्याने सीमावर कु-हाडीने घाव घातले. घाव वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पिंटू घटनास्थळावरून पसार झाला. आर्णी तालुक्यातील देऊरवाडी पुनर्वसन येथील पिंटू बोडखे गत काही दिवसांपासून कोसदनी येथे पत्नीसह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. शनिवारी रात्रभर तो घरी नव्हता. पहाटे घरी आला आणि पत्नीचा कुऱ्हाडीने खून केला. या घटनेची तक्रार आर्णी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस पसार पतीचा शोध घेत आहे. सीमाच्या मागे तीन वर्षाची मुलगी आहे.

- Advertisement -
- Advertisement -