पवईतील ४०० फूट खाणीत तरुणी बुडाल्याची शक्यता

- Advertisement -

महत्वाचे…
१.ही तरुणी काल रात्री एकच्या सुमारास या खाणीजवळ शौचास गेली होती. पण त्यानंतर इथे तिची चप्पल आणि ओढणीच आढळली.
२. गेल्या काही वर्षात ह्या खदानीत आत्महत्या करुन किंवा पडून अनेकांनी आपला जीव गमावला
३.उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी


मुंबई : मुंबईतील पवईच्या रामबाग विभागात असलेल्या चारशे फूट खाणीत एक तरुणी बुडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिजा खान असं १७ वर्षीय तरुणीचं नाव आहे.
ही तरुणी काल रात्री एकच्या सुमारास या खाणीजवळ शौचास गेली होती. पण त्यानंतर इथे तिची चप्पल आणि ओढणीच आढळली. स्थानिकांनी याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिल्यानंतर या तरुणीचा शोध सुरु आहे.

गेल्या काही वर्षात ह्या खदानीत आत्महत्या करुन किंवा पडून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यात मुखतः उघड्यावर शौचास गेल्याने अपघात होऊन अनेक जीव गेले आहेत. याबाबत शासनाने उपाय योजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

- Advertisement -