मनमाड- सावंतवाडीदरम्यान धावली फक्त एक दिवसाची एक्स्प्रेस

- Advertisement -

महत्वाचे…
१. मनमाड ते सावंतवाडीदरम्यान आज एक दिवसाची एक्स्प्रेस धावली. २.ट्रेनला चक्क मनमाड-सावंतवाडी एक्स्प्रेस नाव देण्याचा निर्णय ३. गाडी आठवड्यातून किमान दोन दिवस सोडल्यास थेट कोकण पर्यटनासाठी जाता येणार


मनमाड : मध्य रेल्वे मार्गावरील मनमाड ते सावंतवाडीदरम्यान आज एक दिवसाची एक्स्प्रेस धावली. कोकण रेल्वेसाठी पाठवला जाणारा रॅक रिकामा जाऊ नये, म्हणून ट्रेनला चक्क मनमाड-सावंतवाडी एक्स्प्रेस नाव देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

विशेष म्हणजे, या ट्रेनचं बुकिंग व्हावं, यासाठी मध्य रेल्वेनं या एका दिवसाच्या ट्रेनचा बराच गाजावाजाही केला. त्यामुळे अनेकांनी बुकिंग करुन या गाडीतून प्रवास केला.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने कोकण विभागासाठी गाडी एक स्वतंत्र गाडी सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर गेल्या चार दिवसांपासून त्याचा गाजावाजा सुरु होता. या गाडीमुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना थेट कोकणात पर्यटनासाठी जाण्यासाठी पर्याय उपलब्ध झाल्याने आनंद झाला होता.

या ट्रेनबाबत सोशल मीडियावरुनही मोठी चर्चा सुरु होती. मात्र ट्रेनचा रिकामा रॅक पाठविण्यापेक्षा थेट कोकणापर्यंत रेल्वेला आर्थिक फायदा होईल, असा विचार करुन मनमाड ते सावंतवाडी असं नाव दिल्याचं समजल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला. दरम्यान, मनमाड-सावंतवाडी ही गाडी आठवड्यातून किमान दोन दिवस सोडल्यास थेट कोकण पर्यटनासाठी जाता येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

- Advertisement -