मुंबईत आर्किटेक्ट विद्यार्थिनीचे रॅगिंग,

- Advertisement -

मुंबई- मुंबईतील दादर परिसरातील एका कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. आर्किटेक्चरची विद्यार्थिनी असलेल्या एका तरूणीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कॉलेजमधील ७ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याचा आरोप आहे. संबंधित विद्यार्थिनीला एका प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेण्यासाठी नाचायला भाग पाडले सोबतच डान्सचा व्हिडिओ बनवून तो स्नॅपचॅट अॅपवर अपलोड केला.

ही घटना दादरमधील कॉलेजमधील आहे. सोबत या तरूणीचे टिंडर अॅपवर फोटोजला छेडछेड करून टाकले गेले आहे. संबंधित पीडीत विद्यार्थिनीने दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. एक तक्रार दादर पोलिस ठाण्यात तर एक शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आम्ही कारवाई करणार आहोतच. मात्र त्यापूर्वी कॉलेजमधील अॅंटीरॅगिंग कमिटीला याबाबतच अहवाल सात दिवसात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पोलिस आरोपींवर कारवाई करतील.

- Advertisement -