राहूल गांधीनीं प्रदेश काँग्रेसचे केले अभिनंदन

- Advertisement -

मुंबई: नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मिळविलेल्या अभुतपूर्व यशाबद्दल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा.राहूल गांधी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण व त्यांच्या सहका-यांचे ट्विट करुन अभिनंदन केले.

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकूण ८१ पैकी ७३ जागा जिंकून आपले वर्चस्व सिध्द केले आहे. विजयाचे मोठमोठे दावे करणा-या भाजपाला या निवडणुकीत दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम या पक्षांना खातेही उघडता आले नाही.

या विराट विजयामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नांदेडातून सुरु झालेला हा विजयाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल आणि आगामी निवडणुकांतही काँग्रेस पक्ष विजयी होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -