Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला.

अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होत आहे. विशेष म्हणजे, आज राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा आयोजित करण्यात आला होता.

मिताली ही बालरोगतज्ञ डॉ.संजय बोरुडे यांची कन्या…
मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments