Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र‘कडकनाथ’ जातीच्या कोंबड्यांची क्रांती….

‘कडकनाथ’ जातीच्या कोंबड्यांची क्रांती….

पोल्ट्री फार्मच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुतंगवणूक केली जाते. मात्र आता कडकनाथ जातीच्या कोंबड्याने मोठी क्रांती आणली आहे.  हे असं चिकन आहे ज्याच्या एका कोंबडीची किंमत आहे ५००० रुपये आणि अंड्याचे भाव तब्बल ६०- ७५ रुपये. ज्यामध्ये येतील १५-२० बॉयलर कोबड्या. तुम्हाला आम्ही येथे कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेल मधील कोंबडीचा भाव सांगत नाही, तर हा भाव मिळतो कडकनाथजातीच्या कोंबडीला. मूळ मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील अन प्रामुख्याने धार व झाबुआ जिल्हात पाहायला मिळणारी हि कोंबडीची जात आता महाराष्ट्राच्या मातीत रुजायला लागली. आणि तिची मार्केटिंगसुद्धा मोठ्या धडाक्याने होत आहे. अनेक ढाब्यांवर कडकनाथ चिकन मिळेलअसं लिहलेलं तुम्ही पाहिलं असेलच.

आपण जाणून घेऊया कडकनाथबाबत माहिती……………..

कडकनाथ म्हणजे मध्य प्रदेशातलं कोंबडीचं वाण आहे. मध्य प्रदेशातल्या झांबुआ जिल्ह्यातील हे मूळ वाण. मध्य प्रदेशातल्या आदिवासी भागात पर्यटनासाठी वारंवार जाणाऱ्यालासुद्धा याची माहिती नसायची. कारण एकच आज स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे होऊनही आदिवासी संस्कृती तशी फारशी उजेडात आलेलीच नाहीच. याच लपलेल्या संस्कृतीचा ‘कडकनाथ’ वाण आहे.
या कोंबडीच्या मांसाचा रंग लालसर, काळा असतो म्हणून काहीजणांनी हिचं ‘कालामासी’ असंही नामकरण केलाय. मांस काळं असलं तरी चवीला जबरदस्त रुचकर असं हे चिकन आहे. आज आरोग्यदायी ‘कडकनाथ’ला जगभरातून मागणी येतेय साधारणपणे नराचं वजन दीड ते दोन किलो भरतं आणि मादीचं वजन साधारण सव्वा किलोपर्यंत भरतं. इतर कोणत्याही मांसामधल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणापेक्षा कडकनाथच्या मांसात ते प्रमाण 32 टक्क्यांनी कमी असतं. त्यामुळंच त्याला जगभरातून मागणी वाढत आहे. शिवाय या कोंबडीच्या मांसात 20 टक्के प्रथिनं जास्त असल्याचेही निष्कर्ष पुढे आले आहेत. अनेक जुनाट आजारांवरही या कोंबडीच्या मांसामुळं चांगला फायदा होतो, असं अनेक रुग्ण सांगतात. अर्थात, या सगळ्या अनुभवसापेक्ष प्रतिक्रिया असल्या तरी,कडकनाथचा बोलबाला चांगलाच वाढतोय.

देखभालीसाठीही कमी खर्च एकदा लस दिल्यानंतर ठराविक वेळी स्वच्छता आणि पाण्याची सोय असेल, तर दुसरा कुठलाही खर्च या कोंबड्यांच्या देखभालीसाठी येत नाही. शिवाय शेतातील टाकाऊ पदार्थ, उरलेलं, खराब झालेलं धान्य, असं कुठलंही खाद्य या कोंबड्यांना चालतं. शिवाय त्यांची प्रतिकारशक्तीही चांगली आहे. कडकनाथच्या अंड्यांचा वापर डाएट अंडी म्हणूनही केला जातो. या कडकनाथाने शेतकऱ्यांना उत्पन्नाचं चांगलं माध्यम दिल्याने कडकनाथ कोंबडी चा पालनपोषण करण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे.

कडकनाथ कोंबडी एक आयुर्वेदिक आहे, तिच्या मांसामध्ये व अंड्यांमध्ये पुढील गुणधर्म आहेत.

कडकनाथ कोंबडीचे त्वच्या, मांस, हाडे काळे असतात….
१) कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.
२) कोड फुटलेले कमी होते.
३) अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.
४) याच्या मांसामध्ये पुरूषत्वाचे प्रमाण जास्त आहे मांस खाल्याने पुरूषत्व वाढते.

५) दमा ,अस्तमा,टीबी,या आजारावरही गुणकारी.
६) प्रोटीन आणी लोह चे प्रमान २५-७०% .
७) अंडी डायट अंडी म्हणूनही खाल्ली जातात.
८) मांसामध्ये प्रथीनांचे प्रमाण अधिक.
९) विस्मयकारी औषधी गुणधर्म.
१०) अंडी स्वादीष्ट असुन प्रथीनांचे प्रमान भरपुर आहे.
११)बंगळुर येथील अन्न परिक्षण संशोधन संस्थेत याच्या मांसावर व अड्यांवर औषधी गुणधर्माबाबत संशोधन करण्यात आले व प्रमाणीत केले.

१२) ” कडकनाथच्या ” हाडांमध्ये (मेल्यानिन) नावाचे द्रव्य (पिगमेंट) अधीक प्रमानात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात. यालाच (फायब्रोमेलॅनोसिस) असेही म्हनतात.
१३) या कोबडीमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( २१%) ” लॅबीलीक ” ऍसीडचे प्रमाण अधीक (  २४% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील मार्ग अरूंद होण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी ह्दयविकाराचा झटका ( अटॅक ) येत नाही.
१४) या कोंबडीच्या मांस व आंडी सेवनाने ह्रदयवीकार म्हनजे ( अटॅक) टाळता येतोय.
१५) प्रथीनांचे प्रमान २५% असते.
१६) मांसामध्ये ( कोलेस्टोरॉलचे ) प्रमान इतर कोंबडीच्या तुलनेत(३२  मिलीग्रॅम) प्रती १०० ग्रॅम ऐवढे आहे.
१७) याच्या सेवनाणे रक्ताचा कर्करोग, दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार (ल्युकोडर्मा ), पांढरे डाग, ह्रदयाचे विकार, कमी होतात असा दावा (अन्न परीक्षण केंद्र बंगळूर ) यांनी केला आहे.
१८) मानवी शरीरास वाढीस आवश्यक असलेले (अॅमिनो ) ऍसीड-बी-१, बी-२, बी-६, बी-१२, सी व ई, जीवनसत्वे, कॅल्शीयम, फॉस्परस, आयर्न, इत्यादी घटक पुरविले जातात.

१९) पुरूषांना पुरूषत्व वृध्दींगत करण्यासाठी ,तसेच शुक्रजंतूची वाढ करण्याच्या प्रक्रियेला याच्या नियमीत खाण्याने प्रोत्साहन मिळते.
२०) स्त्रियांच्या पाळीत नियमीतता येण्यास याच्या खाण्यने मदत होते.
२१) कडकनाथ कोंबडीच्या मांस व आंडी खाल्याने शरीरातील चरबीचे प्रमान कमी होते.
२२) तसेच मधुमेह म्हनजेच( बी पी ) साखरेचा आजारही बरा होतो.
२३) Osteomalacia, Womens Sterilty, Problems, Headaches, Renal, (Kidney), Problems Good For (High BP Heart) ….. इत्यादी सर्व आजारांवर ही कोंबडी व अंडी गुणकारी आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments