Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रचैत्यभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर!

चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर!

मुंबई महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावल्याने चैत्यभूमीवर जनसागर उसळला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भिमसैनिकांचे जत्थेच्या जत्थे गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये दाखल झाले होते.

६ डिसेंबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाचा निरोप घेतला.  दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक लाखोंच्या संख्येनं चैत्यभूमीवर येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत येतात. यावर्षी मात्र पावसामुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आसपासच्या ३५ हून अधिक शाळांमध्ये राहण्याची सोय केली. ओखी वादळामुळं झालेल्या पावसाचा चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनासाठी आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांना मोठा फटका बसला. आडोशासाठी शिवाजीपार्कात उभारण्यात आलेला मंडप रात्री आठच्या सुमारास कोसळला होता. यात तीन जण जखमी झाले होते. त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कोसळलेल्या मंडपाखाली अनेकजण अडकले होते. पण फायरब्रिगेडच्या जवानांनी तातडीनं धाव घेत मंडपाखाली अडकलेल्या लोकांची सुटका केली. पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राज्य सरकार भीम अनुयायांना सोईसुविधा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी अनुयायांनी केला. यावेळी उपस्थित लोकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भीमसैनिकांना मोठा दिलासा मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments