Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपेट्रोलच्या किमतीचा भडका, वाहनधारकांच्या खिशाला कात्री

पेट्रोलच्या किमतीचा भडका, वाहनधारकांच्या खिशाला कात्री

मुंबई – पेट्रोलच्या किमतींमध्ये २ रुपयांची वाढ झाल्याने आता पेट्रोल खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये प्रति लिटर ८१.०५ रुपये मोजावे लागणार आहेत. या पेट्रोल दरवाढीमुळे वाहन धारकांची आर्थिक लूट सुरुच आहे.

सोमवारी पेट्रोलचे दर ७९.०४ रुपये प्रति लिटर होते. मात्र या दरांमध्ये २ रुपयांची वाढ झाल्याने आता प्रति लिटर पेट्रोलसाठी ८१.०५ रुपये मोजावे लागणार आहे. २०१३ मध्ये पेट्रोलच्या किमती सर्वात जास्त  म्हणजे ८३ . ६२ रुपये प्रति लिटरवर पोहोचल्या होत्या. आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढलेल्या किमती, युरोपात तेलाची वाढती मागणी यामुळे ही दरवाढ झाली आहे.
१ एप्रिल २०१७ ते १६ जानेवारी २०१८ दरम्यानची मुंबईतील पेट्रोल दर वाढ

दिनांक                                   पेट्रोलचे दर (प्रति लिटर)
१६ जानेवारी २०१८                       ८१.०५ रुपये
१५ जानेवारी २०१८                       ७९.०४ रुपये
१२ जानेवारी २०१८                       ७८.६१ रुपये
१८ डिसेंबर २०१७                        ७७.१४ रुपये
१७ ऑक्टोंबर २०१७                      ७५.३४ रुपये
१७ जुलै २०१७                            ७३.५३ रुपये
१ एप्रिल २०१७                            ७२.८१ रुपये

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments