Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहापालिकेची शाळांच्या खाजगीकरणाकडे वाटचाल

महापालिकेची शाळांच्या खाजगीकरणाकडे वाटचाल

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेने सर्वाधिक जोर शिक्षणावर दिला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी शिक्षणासाठी २५६९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद २३२२ कोटी रुपये होती.
मुंबई महापालिका शिक्षण समिती अर्थसंकल्प
महापालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास योजना (झिरो तिकीट) योजना. प्राथमिकसाठी ५० कोटी, माध्यमिकसाठी – १५ कोटी
टॅब वाटपसाठी तरतूद
प्राथमिकसाठी – ६ कोटी
माध्यमिकसाठी – १२ कोटी
६४९ द्विभाषीक शाळा प्रस्तावित 
पहिलीपासून इंग्रजी विषय आणि इंग्रजी माध्यमातून गणित विषय असणाऱ्या द्विभाषीक शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. २०१८-१९ आणि पुढील काही वर्षांमध्ये ६४९ द्विभाषीक शाळा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधरावे यासाठी नवा अक्षरशिल्प प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत आहे. यात सुलेखन वही, चार रेघी वह्या देण्यात येतील.
शाळांचं खाजगीकरण
पटसंख्या वाढवण्यासाठी बंद पडलेल्या शाळांवर उपाय योजण्यासाठी ३५ शाळा खासगी लोक सहभागाने सुरु होतील. महापालिकेने खाजगीकरणाकडे वाटचाल सुरु केली आहे.
पूरक पोषण आहार
माध्यान्ह पोषण आहारासोबत पूरक पोषण आहार, सुकामेवा देणार
प्राथमिकसाठी – २५ कोटी रुपयांची तरतूद
माध्यमिकसाठी – २.३८ कोटी रुपयांची तरतूद
आंतरराष्ट्रीय शाळा-
२४ विभागांमध्ये २४ आंतरराष्ट्रीय शाळा सुरु करणार
प्राथमिकसाठी तरतूद – २५ लाख रुपये
सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग आणि बर्निंग मशिन – 
६ वी ते ८ वीच्या विद्यार्थिनींसाठी ६८१ नवीन सॅनिटरी वेंडिंग मशिनची खरेदी
९ वी आणि १० वीसाठी सॅनिटरी नॅपकीन आणि डिस्पोझेबल पाऊचची खरेदी
यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद
फुटबॉल प्रशिक्षण
रोड टू जर्मनी कार्यक्रमाद्वारे थेट जर्मनीत प्रशिक्षणाची संधी देणार
सीसीटीव्ही – 
३८१ शालेय इमारतींमध्ये सुरक्षेसाठी एकूण ४ हजार ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद
डिजिटल क्लासरुम
महापालिकेच्या एकूण १३०० वर्गांमध्ये डिजिटल क्लासरुम उभारण्यात येणार.
डिजिटल वर्गात एक एलईडी, प्रोजेक्टर, कंप्युटिंग डिव्हाईस, एक स्पिकर, व्हाईट बोर्ड बसवला जाणार. यासाठी प्राथमिकसाठी ३१ कोटी, तर माध्यमिकसाठी ५.८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सर्व शाळांत ध्वनिक्षेपक यंत्रणा
आणीबाणीच्या काळात आणि इतर वेळीही शाळेतील सर्वांनाच सूचना देणे सोयीचे होण्यासाठी सर्व शाळांमध्ये ध्वनिक्षेपक बसवण्यात येणार आहेत.
तरतूद-  प्राथमिक – ११.५८ कोटी
माध्यमिक – ६३.२५ कोटी
कम्प्युटर लॅब
२८८२ संगणकांची खरेदी करण्यात येणार आहे. प्राथमिकसाठी ६ कोटी, तर माध्यमिकसाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments