Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई बँकेची स्वयंपुर्विकास योजना ही अभिनव आणि लोकाभिमुख- मुख्यमंत्री

मुंबई बँकेची स्वयंपुर्विकास योजना ही अभिनव आणि लोकाभिमुख- मुख्यमंत्री

मुंबईमुंबै बँकेने आणलेली स्वयंपुनर्विकास कर्ज योजना ही अभिनवलोकाभिमुख तसेच खऱ्या अर्थाने जनतेसाठीची योजना असून राज्य सरकार या योजनेच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिल,अशी ग्वाही मामुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिलीया योजनेचा अधिकाधिक लोकांना लाभ व्हावायासाठी स्वयंपुनर्विकासासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकीयोजनेंतर्गत मिळतीलअसे धोरण बनवले जाईलअसेही ते म्हणालेमुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजितकेलेल्या स्वयंपुनर्विकास योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात जरी रहिवशांना नवे घर मिळत असले, तरीही त्यांना मिळणाऱ्या लाभाच्या प्रमाणापेक्षाविकसकाला अधिक लाभ हाेतो. तसेच अनेकदा विकसकामार्फत रहिवाश्यांची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब लक्षात घेत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वयंपुनर्विकास योजना आणण्यात आली आहे. ही योजना आणल्याबद्दल  मुख्यमंत्र्यांनी बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांचे व्यक्तीश: कौतुककेले. ते पुढे म्हणाले की, पुनर्विकासात अनेक अडथळे येत असतात. अनेकदा विकसक वेळेत घर देईल की नाही, या भीतीपोटी लोक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीतनाईलाजास्तव राहत असतात. हे बदलायचे असेल तर एका वेगळ्या योजनेची गरज होती. आता ही योजना अधिक परिणामकारकपणे लोकांपर्यंत पाेहोचण्यासाठी सरकारही प्रयत्न करेल,असे आश्वासन त्यांनी दिले. स्वयंपुनर्विकासासाठी कोणकोणत्या परवानग्या लागतात, याचा एक सविस्तर आराखडा तयार करून त्या मिळवणे सोपे व्हावे,यादृष्टीने धोरण तयारकरण्याच्या सुचना त्यांनी म्हाडाचे अध्यक्ष मिलींद म्हैसकर यांना दिल्या. याशिवाय म्हाडाला या योजनेसाठी प्लानिंग ऑथोरिटी नेमून सर्व परवानग्या एक खिडकी योजनेंतर्गत देण्याच्याअनुषंगाने चाचपणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या योजनेंतर्गत प्रस्ताव कसा तयार करावा, परवानग्या कशा घ्याव्या, याबाबतची एखादी कार्यशाळा घेतली जावी.तसेच या योजनेचा लाभ घेत असताना सर्वसामान्य लोकांना चांगले कंत्राटदार आणि वास्तुविशारद मिळावेत, यासाठी बँकेनेच काही दर्जेदार वास्तुविशारद आणि कंत्राटदारांचे एक पॅनलतयार करावे, अशा काही मौलिक सुचनाही . मुख्यमंत्र्यांनी बँक व्यवस्थापनाला दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments