Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमॉडेल अर्पिता तिवारी मृत्यूप्रकरण आरोपीला अटक

मॉडेल अर्पिता तिवारी मृत्यूप्रकरण आरोपीला अटक

मुंबई – मॉडेल, निवेदिका अर्पिता तिवारीचा राहत असलेल्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबियांनी हा अपघात नसून खून असल्याचा आरोप केला होता. मालवण पोलिसांनी याप्रकरणी २ महिन्यानंतर अमित हजारा नावाच्या आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अर्पिता तिवारीच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबियांनी शंका व्यक्त केली होती. अर्पिता ही बाथरुममधल्या खिडकीतून काचा फोडून अर्धनग्न अवस्थेत आत्महत्या कशी करू शकते ? असा सवाल अर्पिताच्या कुटुबियांनी उपस्थित केला होता. अर्पिताची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. अर्पिताच्या कुटुंबियांच्या आरोपानुसार अर्पिता मृत्युपूर्वी आपल्या वडिलांसोबत फोनवर बोलली होती. तिला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची होती. तिला आयुष्यात खूप मोठे होण्याची इच्छा होती.
अर्पिताचा मित्र लकी शर्माने सांगितले की, अर्पिताच्या मृत्यूच्या दिवशी फ्लॅटमध्ये ५ जण उपस्थित होते. त्या रात्री अर्पिता, तिचा बॉयफ्रेंड आणि इतर मित्र पहाटे ४ वाजेपर्यंत पार्टी करत होते. सकाळी मात्र अर्पिता घरातून गायब झाल्याचे सर्वांना समजले. अर्पिताची बॉडी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर आढळली. शवविच्छेदन अहवालात अतिप्रसंग केल्याचा उल्लेख नाही. पण तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments