Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतील मरोळ येथे बेस्ट बसला अपघात १० प्रवासी जखमी!

मुंबईतील मरोळ येथे बेस्ट बसला अपघात १० प्रवासी जखमी!

मुंबई – मुंबईतील अंधेरीजवळील मरोळ येथे बेस्ट बस आणि डंपर यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये १० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मरोळ आगाराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अपघातग्रस्त बस ऐरोलीवरून अंधेरीकडे येत असताना मरोळ आगाराजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही बस जाऊन डंपरवर घडकली. या अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले. तसेच बसमधून प्रवास करत असलेल्या १० प्रवाशांना दुखापत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments